-
ऋजुता लुकतुके
पारंपरिक मोठ्या बांगड्या किंवा ठसठशीत दागिन्यांच्या तुलनेत हल्लीच्या घराबाहेर पडणाऱ्या महिलांची पसंती छोट्या पण आकर्षक दिसणाऱ्या ब्रेसलेटला असते. मनगटाभोवती साखळी किंवा कड्याच्या रुपाने घालण्याचा हा छोटा दागिना आहे. सोनं किंवा चांदी या मौल्यवान धातूंनी बनवलेल्या या दागिन्यात हिरेही जडवता येतात. त्यामुळे या दागिन्यांची शोभा वाढते. (Gold Bracelet For Women)
ठसठशीत सोन्याच्या दागिन्यांपेक्षा ब्रेसलेट ही सांभाळायला, घालायला आणि देखभालीलाही सोपी. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांच्या तुलनेत ब्रेसलेटचं महत्त्व हल्ली वाढत आहे. शिवाय २४ कॅरेट सोन्याच्या तुलनेत अगदी १४ कॅरेट सोन्यापासूनही ते बनवता येतं. शिवाय अगदी १ ग्रॅम सोन्यात काही अंशी तांबं मिसळवून ते बनवता येतं. त्यामुळे त्याची किंमतही कमी होते. शिवाय ते रोझ गोल्डमध्येही बनवलं जाऊ शकतं. (Gold Bracelet For Women)
(हेही वाचा – Adani Energy Solutions Share Price : अदानी समुहातील या कंपनीने ३ महिन्यांत कमावले ७१४ कोटी रुपये)
एकेकाळी सौभाग्याचं लेणं म्हणून महिला हातभर सोन्याच्या बांगड्या आणि मध्ये मध्ये काचेच्या बांगड्या घालत असत. हळू हळू काळाबरोबर निदान शहरांमध्ये ही पद्धत बंद झाली आहे. महिला बोजड बांगड्यांच्या ऐवजी नियमित वापरासाठी ब्रेसलेटना पसंती देऊ लागल्या आहेत. पण, बांगड्यांची झालेली सवय म्हणा किंवा आणखी काही, अनेकांना अजूनही बांगड्यांच्या आकारातील आणि त्याच साच्यातील ब्रेसलेट जास्त आवडतात. ही न वाकणारी ब्रेसलेट असतात. तर ब्रेसलेटचा दुसरा प्रकार म्हणजे नाजूक आणि साखळीसारखं दिसणारं ब्रेसलेट. (Gold Bracelet For Women)
प्लॅटिनम धातूतही हे ब्रेसलेट बनवता येतं आणि त्यात हिरे जडवता येतात. वर म्हटल्याप्रमाणे अगदी १ ग्रॅम सोन्यातही हे ब्रेसलेट बनवता येतं आणि अशा ब्रेसलेटची किंमत अगदी २०,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते. पण, जसं सोनं वाढतं तशी किंमत आणि घडणावळ वाढत जाते. शिवाय हिरे जडवलेले असतील तर ती किंमतही वाढते आणि अशावेळी ४०,००० रुपयांपासून ते सरासरी ७५,००० रुपयांपर्यंत १४ ग्रॅम वजनाचं ब्रेसलेट तुम्हाला मिळू शकतं. हिरे जडलेले असतील तर हीच किंमत लाखांत जाते. (Gold Bracelet For Women)
(हेही वाचा – Tanush Kotian : मुंबईकर तनुष कोटियन पंजाब किंग्जचा नेट्स गोलंदाज)
तुलनेनं साखळी पद्धतीचे ब्रेसलेट वजनाने हलकं असतं आणि वजनानुसार, त्याची किंमतही कमी असते. महिलांची पसंती अलीकडे रोझ गोल्डने बनलेल्या ब्रेसलेटलाही आहे. बांगडी सारखं दिसणारं कडं, साखळीचं ब्रेसलेट, टेनिस ब्रेसलेट, छोटी छोटी कडी एकमेकांत गुंफून केलेलं ब्रेसलेट असे त्याचे प्रकार आहेत. ब्रेसलेट हा दागिन्यांचा प्रकार युरोपातून आपल्याकडे आला. पण, आता महिलांमध्ये चांगलाच रुजला आहे. मलबार ज्वेलर्स, तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्ससारखे तयार दागिन्यांचे ब्रँड दरवर्षी आपलं खास ब्रेसलेट कलेक्शन महिलांसाठी बाहेर आणत असतात. (Gold Bracelet For Women)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community