Gloria Church पाडून पुन्हा नवीन का बांधलं? काय आहे खरा इतिहास?

17
Gloria Church पाडून पुन्हा नवीन का बांधलं? काय आहे खरा इतिहास?
ग्लोरिया चर्चचा इतिहास

ग्लोरिया चर्चच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर १५४८ सालच्या सुमारास मुंबईच्या हार्बर लाईनच्या माझगाव नावाच्या उपनगरात बांधलेल्या एका खाजगी चॅपलपासून सुरू होतो. त्याकाळी ‘नोसा सेनहोरा दा ग्लोरिया’ नावाचं मूळ चर्च १६३२ साली पोर्तुगीज फ्रान्सिस्कन्सनी माझगाव टेकडीच्या पायथ्याशी बांधलं होतं. डी सूझा ई लिमा या कुटुंबाने पोर्तुगालच्या राजाकडून माझगाव हे बेट मिळवल्यानंतर १५७२ साली या चर्चसाठी निधी दिला होता. सुरुवातीच्या या चर्चने तीन शतकांपेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली स्थानिक कॅथलिक समुदायाची सेवा केली. (Gloria Church)

(हेही वाचा – Shivrajyabhishek Din :   ३५२व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीची राज्य शासनासोबत चर्चा)

ग्लोरिया चर्चची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी

२० व्या शतकाच्या सुरुवातीला माझगाव इथलं चर्च संरचनात्मकदृष्ट्या अयोग्य मानले गेलं. त्यामुळे १९११ साली ते चर्च पाडण्यात आलं. त्यानंतर भायखळा इथे एक नवीन चर्च बांधण्यात आलं. हे चर्च इंग्रजी गॉथिक वास्तूशैलीमध्ये डिझाइन केलेलं होतं. चर्चचा लॅटिन क्रॉस आकार, उंच बुरुज आणि १६० फूट उंचीचे चार बुरुज हे त्याचं वैशिष्ट्य आहे. (Gloria Church)

या चर्चचं बांधकाम १९११ साली सुरू झालं आणि १९१२ साली पूर्ण झालं. त्यानंतर हे चर्च १९१३ साली सर्वसामान्यांसाठी उघडलं गेलं. चर्चची नवीन रचना ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती. हे चर्च त्याच्या भव्य वास्तुकला आणि लाकडी प्यू, स्टेन्ड ग्लास खिडक्या, एक व्यासपीठ, पाईप ऑर्गन, झुंबर आणि आधारस्तंभांसोबतच गुंतागुंतीचं नक्षीकाम केलेल्या त्याच्या आतल्या भागांसाठी प्रसिद्ध होतं. (Gloria Church)

(हेही वाचा – Peshwa Baji Rao : मुघल साम्राज्याला सळो की पळो करणार्‍या Peshwa Baji Rao यांची धडाकेबाज कारकीर्द!)

या चर्चने २०१३ साली त्याची शताब्दी साजरी केली. चर्चचा वारसा जपण्यासाठी त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. २०१९ साली या पुनर्संचयन प्रकल्पाला त्याचं ऐतिहासिक आणि स्थापत्यशैलीचं महत्त्व टिकवून ठेवण्याच्या चर्चच्या प्रयत्नांना मान्यता देऊन सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार मिळाला होता. (Gloria Church)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.