-
ऋजुता लुकतुके
सॅमसंगने आपल्या एफ५६ फोनच्या पुढील पिढीतला अवतार भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. एक्झिनॉस १४८० चिपसेट असलेला हा फोन आहे आणि हेच त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. ८ जीबी रॅम तसंच १२८ जीबी स्टोरेज असलेला मूलभूत फोन कंपनीने २५,९९९ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. हल्लीच्या इतर फोनप्रमाणे या फोनची बॅटरीही ५००० एमएएच क्षमतेची म्हणजे तगडी आहे. सॅमसंग कंपनीने अलीकडे मध्यम किमतीच्या मोबाईल फोनवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. हा ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा पण, फिचर्स आणि कामगिरीच्या दृष्टीने तगडा फोन सॅमसंगने ग्राहकांसाठी आणला आहे. या फोनसाठी कंपनी ६ वर्षं मोफत अपडेटही देणार आहे. (Galaxy F56)
सॅमसंगच्या एफ मालिकेतील हा सगळ्यात पातळ फोन आहे. त्याची जाडी फक्त ७.२ मिमी इतकी आहे. फोनच्या डिस्प्लेवर गोरिला काच बसवली आहे. तसंच कॅमेरा आयलंडवर तीन कॅमेरे दिमाखात झळकत आहेत. यातील मूलभूत कॅमेरा हा ५० मेगा पिक्सेलचा आहे. फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. सुपर एमोल्ड असलेला हा डिस्प्ले १५०० नीट्स प्रखरता असलेला आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटचा आहे. सूर्यप्रकाशात फोन चमकल्यामुळे कधी कधी डिस्प्ले नीट दिसत नाही. त्यासाठी या फोनमध्ये व्हिजन बूस्टर बसवण्यात आला आहे आणि तो आपोआप आपलं काम करतो. फोनला डिस्प्ले आणि मागचं कव्हरही काचेचं बनलेलं आहे. शिवाय फ्रेम स्टीलची आहे. त्यामुळे फोन दिसायला छान दिसतो. (Galaxy F56)
(हेही वाचा – Dhananjay Munde : राजकीय रणांगणातून विश्रांतीकडे मुंडे?)
Samsung Galaxy F56 Pricing in India 🇮🇳
8/128GB – ₹27,999
8/256GB – ₹30,999Its the rebranded M56, available on Flipkart.
Thoughts? pic.twitter.com/kGw3tFnxbC
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) May 5, 2025
वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये एक्झिनॉस १४८० हा तगडा प्रोसेसर आहे. ५० मेगापिक्सेलच्या तीन कॅमेरांमध्ये कमी प्रकाशातही सुस्पष्ट फोटो काढण्याची क्षमता आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा १२ मेगा पिक्सेलचा आहे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला फोन २५,९९९ रुपयांना मिळणार आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोन २९,९९९ रुपयांना मिळणार आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर हा फोन ऑनलाईन उपलब्ध आहे. इन्डसइंड बँकेच्या कार्डवर तुम्हाला २,००० रुपयांची सवलतही मिळणार आहे. (Galaxy F56)
फोनबरोबर ४५ वॅटचा फास्ट चार्जर मिळणार आहे. अँड्रॉईड १५ प्रणालीवर चालणाऱ्या या फोनसाठी तुम्हाला ६ वर्षं फिचर व सुरक्षाविषयक अपडेट मिळत राहणार आहेत. तसंच सॅमसंग वॉलेटचं टॅग अँड पे फिचर या फोनमध्ये आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनचं दमदार स्वागत झालं आहे. (Galaxy F56)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community