सध्या भारतात Flying रेस्टॉरंट ट्रेंड सुरू आहे. साधारण १५० ते १७० फूट उंचीवर बसून जेवणाचा आनंद घ्यायला कोणाला नाही आवडणार? गोवा आणि नोएडानंतर आता हिमाचल प्रदेशात मनाली येथे हे सुंदर Flying रेस्टॉरंट सुरू झाले आहे. हे देशातील तिसरे आणि हिमाचलमधील पहिले फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट आहे. इथे जेवणासोबत पर्यटकांना १७० फूट उंचीवरून निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला )
Flying रेस्टॉरंटचा ट्रेंड
मनालीतील फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये एकावेळी २४ लोक बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. जेवणादरम्यान पर्यटकांना उंचावरून रानीसुई, इंद्रा, किल्ला, हमता आणि रोहतांगच्या टेकड्याही पाहता येतील. गोव्यामधील Flying रेस्टॉरंट सुद्धा लोकप्रिय झाले असून येथून तुम्हाला समुद्रकिनाऱ्याजवळील सूर्यास्ताचा अनुभव घेता.
या Flying रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना एकदाच ऑर्डर द्यावी लागेल. हवेत गेल्यावर मध्येच ऑर्डर करता येणार नाही.
मनालीमधील रेस्टॉरंटचे मालक दमन कपूर यांनी सांगितले की, येथे तुम्हाला प्रतिव्यक्ती लंच किंवा डिनरसाठी Slot नुसार ३ हजार ९९९ रुपये द्यावे लागतील. हे Flying रेस्टॉरंट पूर्णपणे सुरक्षित आहे. या सुविधेतून ४० तरुणांना रोजगार मिळतो असेही ते म्हणाले.