
-
ऋजुता लुकतुके
मेटा (पूर्वाश्रमीची फेसबुक) कंपनीचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गसाठी (Mark Zuckerberg) २०२५ चं वर्षं दणक्यात सुरू झालं आहे. गेल्यावर्षी मेटा कंपनीने आपल्या प्रोग्राममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आणि त्याची फळं सप्टेंबर २०२४ पासून झुकरबर्गला मिळायला सुरूवात झाली आहे. झुकरबर्ग हा जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहांत होताच. आता मेटा कंपनीच्या वाढलेल्या शेअरच्या किमतींमुळे तो पहिल्या चारांत पोहोचला आहे. आणि २०० अब्ज अमेरिकन डॉलर (American Dollar) इतकी मिळकत असलेल्या जगातील फक्त ४ उद्योजकांच्या यादीत दिमाखात जाऊन बसला आहे.
झुकरबर्गकडे मेटा कंपनीचे १४ टक्के शेअर आहेत. आणि तोच त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. २०२४ मध्ये मेटाचे शेअर तब्बल ७० टक्क्यांनी वर चढले. त्याचाच फायदा झुकरबर्गला (Mark Zuckerberg) झाला आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत आता टेस्लाचे मालक इलॉन मस्क(Elon Musk) (४१०.८ अब्ज अमेरिकन डॉलर) आणि ओरॅकलचे लॅरी एलीसन (२५८ अब्ज अमेरिकन डॉलर) हे दोनच अमेरिकन उद्योजक आहेत. त्यांच्या खालोखाल २३५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आहे. आणि चौथ्या क्रमांकावर आहेत ॲमेझॉनचे जेफ बेझोस(Jeff Bezos). त्यांची संपत्ती २२३ अब्ज अमेरिकन डॉलरची आहे. (Facebook Owner Net Worth)
(हेही वाचा – Cricket Stadium in India : तुम्हाला माहित आहे का, भारतात एकूण किती क्रिकेट स्टेडिअम आहेत ?)
मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची कमाई आणखी एका बाबतीत आहे. मेटा कंपनी मार्फत ते फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सॲप आणि मेसेंजर ही चार सोशल मीडिया ॲप चालवतात. आणि या चारही ॲपचे मिळून सदस्य आहेत ३ अब्ज लोक. म्हणजेच जगातील निम्मी लोकसंख्या झुकरबर्ग यांनी तयार केलेलं सोशल मीडिया ॲप वापरतात, असा त्याचा अर्थ आहे. ३ अब्ज लोकांना व्हर्च्युअल माध्यमातून एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठी झुकरबर्ग यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. (Facebook Owner Net Worth)
झुकरबर्ग यांचा प्रोग्रामिंगकडे कल लहानपणापासूनच होता. आठवीत असताना त्यांनी वडिलांना दंतवैद्यकीय व्यवसायात अपॉइंटमेंट घेण्यासाठी मदत करणारं आणि उपचारांविषयक माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी एक घरगुती ॲप तयार करून दिलं होतं. हे ॲप तेव्हाच रुग्णांमध्ये लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर झुकरबर्ग यांनी कुटुंबातील लोकांसाठी एक असंच ॲप बनवलं. एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी केलेली ही सोय होती. (Facebook Owner Net Worth)
(हेही वाचा – Maval येथील ‘तो’ पूल अनेक महिन्यांपासून होता बंद तरीही कसा कोसळला? जाणून घ्या…)
त्यातून हार्वर्डला गेल्यावर त्यांना फेसबुकची कल्पना सुचली. आपल्या ३ मित्रांसह आधी त्यांनी फेसमॅश हे ॲप तयार केलं. त्यात लोकांचे गोपनीय फोटो वापरल्यामुळे ते कॉलेजमधून काढले जाण्यापासून कसेबसे वाचले. पण, मग आपल्या पुढील उपक्रमात ही चूक त्यांनी सुधारली. आणि फक्त कॉलेजच्या पातळीवर फेसबुक (Facebook) तयार केलं. त्यांच्याबरोबर आणखी ३ सदस्य होते. डॉरमेटरीमध्ये राहून त्यांनी हे ॲप त्या काळात चालवलं. पुढे कॉलेज सुटल्यावर झुकरबर्ग यांनी ते अधिकृतपणे लाँच केलं. तेव्हाच्या त्यांच्या भागिदारांनी त्यांच्यावर कॉलेज उपक्रमाचा व्यावसायिक फायदा उचलल्याबद्दल दावा ठोकला होता. पण, या तिघांना फेसबुकचे शेअर दिल्यावर हे भांडण मिटलं. (Facebook Owner Net Worth)
पुढे फेसबुकची वाटचाल जगातील नंबर वनचं सोशल मीडिया ॲप म्हणून झाली. आणि कंपनीने पुढे इन्स्टाग्रामही लाँच केलं. वॉट्सॲप विकत घेतलं. आणि फेसबुक मेसेंजर लाँच केला. २०२१ साली झुकरबर्गने आपल्या कंपनीचं फेसबुक नाव बदलून मेटा केलं. आणि तेव्हापासून व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटड रियालिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणारे प्रोग्राम आणण्यावर त्याने लक्ष केंद्रीत केलं आहे. २००६ साली फेसबुकची स्थापना झाली. आणि तेव्हापासून १९ वर्षांत झुकरबर्ग जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंत पोहोचला आहे. फेसबुकचा वापर राजकीय प्रचारासाठी करणं, राजकीय विरोधकांची पोस्ट फेसबुकवर दाबणं आणि महत्त्वाचं म्हणजे फेसबुककडे असलेला डेटा व्यापारी वापरासाठी कंपन्यांना विकणं असे आरोपही मधल्या काळात झुकरबर्गवर झाले. पण, तो ते कायम नाकारत आला आहे. (Facebook Owner Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community