Ertiga Price in Mumbai : मारुती इर्टिगाच्या किमतीत ‘या’ महिन्यात झाली इतकी वाढ

Ertiga Price in Mumbai : इर्टिगा ही मारुती सुझुकी कंपनीची लोकप्रिय एमपीव्ही आहे. 

40
Ertiga Price in Mumbai : मारुती इर्टिगाच्या किमतीत 'या' महिन्यात झाली इतकी वाढ
  • ऋजुता लुकतुके

टोयोटा इनोव्हा आणि स्कोडा टवेरा या गाड्यांना टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकीने इर्टिगा ही मल्टीपर्पज व्हेहिकल अर्थात एमपीव्ही भारतात लाँच केली. अल्पावधीतच या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्याच महिन्यात मारुती सुझुकीने आपल्या मोठ्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. मारुती इर्टिगाचाही यात समावेश आहे. भारतात मारुती सुझुकीचं मोठं डिलर नेटवर्क आहे. अशा शोरुममध्ये ८.९६ लाख ते १३.२५ लाख रुपयांमध्ये तुम्हाला इर्टिगा गाडी मिळू शकेल. (Ertiga Price in Mumbai)

(हेही वाचा – कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा ओकली गरळ; म्हणाले, Operation Sindoor हे लहान मुलांच्या…)

मात्र गेल्याच महिन्यात कंपनीने इर्टिगासह फ्रॉक्स आणि एक्सएल ६ या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. इर्टिगाच्या सर्व मॉडेलवर आता तुम्हाला अतिरिक्त १२,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ लगेचच सुरू झाली आहे. वर दिलेली किंमत ही वाढ गृहित धरून दिली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर गेलात तर ही दरवाढ तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल. मारुती इर्टिगा ही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंजिनांमध्ये व्हीएक्सआय आणि एलएक्सआय या दोन प्रकारात उपलब्ध आहे. यातही चारही श्रेणींमध्ये दरवाढ झाली आहे. (Ertiga Price in Mumbai)

आता मारुती इर्टिगाच्या विविध मॉडेलसाठीच्या किमती प्रत्यक्ष पाहूया. या किमती एक्स शोरुम आणि मुंबई महानगरासाठीच्या आहेत. (Ertiga Price in Mumbai)

(हेही वाचा – Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !)

मॉडेल

किंमत (रुपयांमध्ये, एक्स शोरुम, मुंबईत)

हायब्रीड एलएक्सआय

८.९७ लाख

हायब्रीड व्हीएक्सआय

१०.०५ लाख

सीएनजी व्हीएक्सआय

११.५ लाख

हायब्रीड झेडएक्सआय (ओ)

११.१५ लाख

हायब्रीड व्हीएक्सआय एटी

११.४५ लाख

हायब्रीड झेडएक्सआय प्लस

११.८५ लाख

सीएनजी झेडएक्सआय

१२.१० लाख

हायब्रीड झेडएक्सआय

१२.५५ लाख

सीएनजी (ओ)

११ लाख

हायब्रीड झेडएक्सआय प्लस

१३.२५ लाख

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.