-
ऋजुता लुकतुके
या आठवड्यात आणि खासकरून गुरुवारच्या दिवशी चर्चेत असलेला एक शेअर म्हणजे डिक्सॉन टेक्नोलॉजीजचा शेअर. मागच्या ५ दिवसांत मिळून या शेअरमध्ये एकूण २,२६९ म्हणजे १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. याला कारण, अर्थातच अमेरिकेचं आयात शुल्क धोरण हे आहे. एकतर इलेक्ट्रिक क्षेत्रातील ही सेवा कंपनी आहे. अमेरिकेनं या क्षेत्रात चीनवर निर्बंध लादले तर त्याचा थेट फायदा भारतीय कंपन्यांवर होणार आहे. चीनकडून मागणी कमी होऊन ती भारताला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेनं आयात शुल्क वाढीलाच ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर तर या कंपनीचे शेअर आठवडाभर सुसाट आहेत. (Dixon Technologies Share Price)
गुरुवारी शेअर बाजार (Stock market) बंद झाला तेव्हा हा शेअर ५७ अंशांच्या वाढीसह १५,३०९ रुपयांवर बंद झाला. पण, २ एप्रिलच्या घसरणीनंतर हा शेअर सावरून १७ टक्क्यांनी वाढला आहे.
(हेही वाचा – Carnac Railway Flyover चे काम पुढील ५३ दिवसांत पूर्ण करणार)
डिक्सन कंपनीने (Dixon Company) अलीकडेच इलेक्ट्रो उत्पादन कंपनीशी एक महत्त्वाचा करार केला. त्या अंतर्गत डिक्सनची एक उपकंपनी इलेक्ट्रोला रेफ्रिजरेटरसाठी लागणारे सुटे भाग पुरवणार आहे. काही महिन्यात केलेला हा दुसरा मोठा करार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात डिक्सनने विवो फोनबरोबर (Vivo phone) एक करार केला असून त्या अंतर्गत विवोचे फोन भारतात बनवण्यासाठी एक संयुक्त कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आणि त्यातील मोबाईल फोन उत्पादनाची जबाबदारी डिक्सनवर असेल. नवीन स्थापन होणाऱ्या या कंपनीत ५१ टक्के हिस्सेदारीही डिक्सनचीच असेल. या सकारात्मक बातम्यांचा परिणाम डिक्सनच्या शेअरवर येणाऱ्या दिवसांत दिसू शकतो. (Dixon Technologies Share Price)
सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीपासून डिक्सन कंपनीने निकालांमध्येही सातत्य दाखवलं आहे. पण, १९,१४८ या आपल्या उच्चांकापेक्षा शेअर अजून खाली आहे. मोतीलाल ओस्वाल, आनंद राठी (Anand Rathi) आणि शेअर खान या भारतीय संशोधन कंपन्यांनी या शेअरसाठी २०,००० ते २१,००० रुपयांच्या दरम्यान लक्ष्य निर्धारित केलं आहे. (Dixon Technologies Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी विक्रीवर सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community