
भारतातलं पहिलं आणि सर्वांत मोठं डायनासॉर संग्रहालय आणि जीवाश्म उद्यान हे गुजरात इथल्या रायओली नावाच्या गावात आहे. त्याला ‘द बालासिनोर डायनासॉर संग्रहालय’ म्हणतात. १९७० साली गुजरात सरकारच्या वन विभागाने वृक्षारोपण आणि पुनर्संचयनाचे प्रयत्न सुरू केले. भारताचं जुरासिक पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानाचा आकार ४२८ हेक्टर एवढा आहे. या उद्यानामध्ये डायनासॉर विभाग, जीवाश्म विभाग असे अनेक विभाग आहेत. या उद्यानाचं व्यवस्थापन गुजरात इकोलॉजिकल अँड रिसर्च फाउंडेशन म्हणजेच GEER या संस्थेद्वारे केलं जातं. (Dinosaur Park)
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs PBKS : बंगळुरूच्या विजयानंतर विराटचं ‘विराट सेलिब्रेशन’ व्हायरल; श्रेयस अय्यरही वैतागला)
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ८ जून २०१९ साली या संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं. या संग्रहालयामध्ये डायनासॉरच्या हाडांच्या जीवाश्मांचा सर्वांत जुना रेकॉर्ड हा मध्य जुरासिक काळातला आहे. ते जीवाश्म कच्छ बेसिनच्या पंचमहल रचनेत सापडलेले आहेत. या प्रदेशात वरच्या क्रेटेशियस रचनेत आढळणारे जीवाश्म ६६ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. सापडलेली अंडी वेगवेगळ्या आकाराची आहेत. काही तर तोफगोळ्यांच्या आकारांची आहेत. या विशाल प्राण्यांचे जीवाश्म या उद्यानात प्रदर्शित केले आहेत. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या डायनासॉरमध्ये टायरानोसॉरस रेक्स, मेगालोसॉरस, टायटानोसॉरस, बारापासॉरस, ब्रॅकिओसॉरस, अंटार्क्टोसॉरस, स्टेगोसॉरस आणि इगुआनोडॉन यांचा समावेश आहे. (Dinosaur Park)
(हेही वाचा – पुण्यातील Tanisha Bhise प्रकरणात सरकार आक्रमक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्हाड)
या उद्यानात डायनासॉरचे जीवन-आकाराचे मॉडेल्स, त्यांच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कालखंडाची माहिती आणि त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये प्रदर्शित कलेली आहेत. हे जीवाश्म सोनगीर बाग खोरे, बालसिनोरचे हिमतनगर खोरे, खेडा, पंचमहल आणि राज्यातल्या वडोदरा जिल्ह्यांच्या आग्नेय भागात आढळले. महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर शहराचा अविभाज्य भाग असलेलं रायओली आता जगातलं तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं डायनासोर जीवाश्म स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं सर्वात मोठं डायनासॉर उद्यान हॅचरी हे आहे. तिथे सुमारे १०,००० डायनासॉरची अंडी उत्खनन करून जतन करण्यात आली आहेत. हे गुजरातच्या पर्यटन उद्योगाला मोठी चालना देणारं आहे. (Dinosaur Park)
(हेही वाचा – Muslim : कर्नाटकात ३० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या ३९ लाखांवरून ७७ लाख वाढली; हिंदूंची संख्या किती वाढली?)
जीवाश्म संग्रहालयात पाहण्यासारख्या गोष्टी
- या उद्यानात वेगवेगळ्या प्राण्यांचे विशाल पुतळे आणि प्रत्यक्ष आकाराच्या डायनासॉरच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या आहेत.
- हे संग्रहालय ३६० अंश ३डी प्रोजेक्शन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, इंटरॅक्टिव्ह कियॉस्क अशा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
- येथे भारतातल्या डायनासोरचे तपशील आणि जीवाश्म प्रदर्शने प्रदर्शित करणाऱ्या सुमारे १० गॅलरी आहेत.
- इथे प्राण्यांच्या सवयी आणि अधिवासांवर प्रकाश टाकणाऱ्या सुमारे ५० मूर्ती आहेत.
- या ठिकाणी उत्खननातून जाड पायांच्या, जड शरीराच्या प्राण्यांच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले आहेत. ज्याला राजासौरस नर्मडेन्सिस म्हणतात.
- सोमवार वगळता सर्व दिवस हे संग्रहालय पर्यटकांसाठी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत खुले असते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community