Digital Detox : सोशल मीडियापासून एक आठवडा रहा दूर आणि नैराश्य, चिंतेपासून मिळवा मुक्ती

92

सध्या आपण सर्वच सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकले आहोत. जगातील सर्वाधिक लोक सोशल मीडियाचा वापर करत असतील. त्यामुळे तणाव, चिंता, नैराश्य या मानसिक आजारांना बळी पडत आहेत. हे आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ हे डिजिटल डिटॉक्स कॉन्सेप्टला एक्सप्लोर करताना दिसतात. नुकतेच इंग्लडच्या बाथ विद्यापीठातील संधोधकांनी एक संशोधन केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, सोशल मीडियापासून फक्त एक आठवडा ब्रेक घेतल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते.

(हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या ‘या’ FREE सेवांबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या!)

काय आहे डिजिटल डिटॉक्स?

ज्याप्रमाणे लोकांना दारू, सिगारेट अशा अमली पदार्थाचे व्यसन लागते, त्याप्रमाणे त्यांना अभासी जगात राहण्याचीही सवय होते. त्यांना इच्छा असूनही त्यातून बाहेर पडणं किंवा दूर राहणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काहीकाळ डिजिटल सुट्टीवर जाणे किंवा सोशल मिडियापासून दूर रहाणे याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात.

इंग्लंडच्या बाथ विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन करताना १८ ते ७२ वर्ष वयोगटातील १५४ लोकांचा समावेश केला होता. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटाला सोशल मिडियावर बॅन करण्यात आले तर दुसरा गट सोशल मीडियाचा वापर करणारा होता. यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातून सरासरी ८ तास सोशल मीडिया अ‍ॅप्सवर घालवले. या सहभागी असणाऱ्या लोकांच्या ३ चाचण्या घेण्यात आल्यात. यामध्ये नैराश्य आणि चिंताशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता.

तर जेफ लॅम्बर्ट नावाच्या संशोधकाने असे म्हटले की, फक्त एका आठवड्यात पहिल्या गटातील लोकांचा मूड सुधारला आणि चिंतेची लक्षणे कमी झाल्याचे पाहायला मिळाले. याचा अर्थ असा की, सोशल मीडियापासून लहान ब्रेक देखील मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.