Hair Health : केसांच्या आरोग्यासाठी जाहिरातींना भुरळू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या

109
Hair Health : केसांच्या आरोग्यासाठी जाहिरातींना भुरळू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या

केस राठ होणे, सतत कोंडा होणे, केसांना फाटे (Hair Health) फुटणे, दररोज शंभरहून अधिक केसांची गळती ही लक्षणे तुमचे केस आजारी असल्याचे संकेत देतात. दूषित पाणी आणि वायू प्रदूषण या दोन घटकांमुळे केसांवर दुष्परिणाम होत असल्याचे ट्रायकॉलॉजिस्टकडून सांगण्यात येत आहे. शरीरात औषधांचा मारा आणि केसांवर रसायनांचा मारा सतत होत असेल टीव्हीवरील जाहिरातींना भुरळू नका,केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असेल तेव्हा योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

केस सतत गळत (Hair Health) असल्यास तरुण-तरुणी डॉक्टरांचा सल्ला न घेता ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून केसांची उत्पादने मागवतात. सध्याच्या काळात जाहिरातींमधून केसांचे आरोग्य टिकवण्यासंदर्भात अनेक उपायांचा मारा होत असतो. महागडी प्रॉडक्ट वापरूनही केस गळती थांबत नाही. केस जास्त गळायला लागले किंवा टक्कल पडायला सुरुवात झाली की मग डॉक्टरांकडे धावतात. दरम्यान बराचसा वेळ निघून गेला असतो. पुरुषांना डोक्याच्या मध्यभागी पुरुषांना तर स्त्रियांना कपाळाच्या मधून टक्कल पडण्यास सुरुवात झाली की उपचार आव्हानात्मक परिस्थितीत असतात.

(हेही वाचा – Hair Care : मेथीपासून घरच्या घरी बनवलेला शॅम्पू वापरा, केसांची लांबी वाढवा)

केसांचे आरोग्य (Hair Health) समजून घेण्यासाठी आरोग्यदायी केस आणि आजारी केस अशा दोन वर्गवारी केल्या जातात असे ट्रायकॉलॉजिस्ट सांगतात. दर दिवसाला दीडशेहून अधिक केस गळणे, टप्प्याने टक्कल येणे, वेणी छोट्या आकाराची होणे या लक्षणांकडे दुर्लक्ष नको.

केसांची योग्य निगा कशी राखावी

  • केसांची वाढ (Hair Health) होण्यास आणि केसगळती कमी होण्यास मेंदूतील रक्त प्रवाहाची मेंदूतील रक्त प्रवाहाची महत्वाची भूमिका असते. मेंदूतील रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी योगासने, व्यायाम आणि चांगल्या प्रतीचा कंगवा वापरावा.
  • डोक्याच्या त्वचेवर सतत धुळीचा थर साचल्यास कोंडा होण्याची शक्यता असते. कोरड्या वातावरणात, प्रवासात डोक्यात धूळ साचत असेल तर केस नित्यनियमाने धुणे गरजेचे आहे.
  • रोज केस धुणे शक्य नसल्यास डोक्याच्या त्वचेला ओल्या रुमालाने पुसावे.
  • डोक्यात जास्त तेल लावून प्रवास करू नये. तेलामुळे केसांवर धूळ जास्त चिकटते.
  • केस धुण्याच्या आदल्या दिवशी तेल लावावे किंवा केस धुण्या अगोदर किमान तीन तास अगोदर लावावे
  • शॅम्पू थेट केसांना लावू नये. दीड चमचा पाण्यात शॅम्पू विरघळवून घ्यावा. मिश्रण केवळ केसांच्या त्वचेला लावावे. हाताच्या बोटांनी केसाच्या त्वचेला मसाज द्यावा.
  • केसांसाठी शाम्पू आणि कंडिशनर ट्रायकॉलॉजिस्ट यांच्या सल्ल्यानुसार वापरावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.