
-
ऋजुता लुकतुके
संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी कोचिन शिपयार्डला अलीकडच्या काळात एक मोठी आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली आहे. जहाज बांधणी क्षेत्रातील ही अव्वल कंपनी जहाज दुरुस्तीचे क्लस्टर उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने नवीन सहकार्य करार केला आहे. मूळातच जहाज बांधणी हे दीर्घ काळ चालणारं काम आहे. त्यामुळे येणारी प्रत्येक ऑर्डर ही मोठी आणि काही महिने, वर्षं चालणारी असते. त्यानुसार, कंपनीला होणारा नफाही तगडा असतो. गुंतवणूकदारांसाठी हा हिशोब अगदी साधा आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्या या भरवशाच्या आणि चांगला लाभांश मिळवून देणाऱ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. कोचिन शिपयार्ड याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव कमावून असलेल्या या कंपनीवर आनंद राठी या संशोधन संस्थेनं ताजा अहवाल तयार केला आहे. (Cochin Shipyard Share Price)
मागच्या काही महिन्यात शेअरमध्ये लोकांनी चांगला पैसा गुंतवला आहे. या हालचालींमुळे आता शेअरची टॉप गिअरची वेळ झाली आहे, असं संस्थेचं म्हणणं आहे. त्यांनी पुढील एका वर्षांत शेअर १,६६० रुपयांचा टप्पा गाठेल म्हणजे गुंतवणूकदारांना ११ टक्क्यांचा निव्वळ परतावा मिळेल, असा अहवाल सादर केला आहे. या बातमीनंतर आठवडाभरात शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी एकूणच भारतीय शेअर बाजाराला उतरती कळा लागली होती. त्यात या शेअरचंही ४.२५ टक्क्यांचं नुकसान झालं आणि हा शेअर १,४१५ रुपयांच्या पातळीवर आला आहे. (Cochin Shipyard Share Price)
(हेही वाचा – Swan Energy Share Price : स्वॉन एनर्जीच्या शेअरमध्ये वर्षभर पडझड का झाली?)
‘कोचिन शिपयार्ड कंपनीच्या शेअरच्या अलीकडच्या किमतींचा आढावा घेतला तर या शेअरने इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला आहे. हे चित्र सकारात्मक आहे आणि शेअरमध्ये येणाऱ्या दिवसांत ब्रेक आऊट असेल असं दाखवणारं आहे. शिवाय शेअरमध्ये लोकांची उलाढाल गेले काही दिवस वाढत आहे. त्यामुळेच हा ब्रेक आऊट बिंदू तयार झाला आहे. आता कंपनीचं पुढील लक्ष्य हे १,६६० रुपयांचं असेल आणि १,५०० रुपयांपासून हा शेअर खरेदी करायला हरकत नाही,’ असं आनंद राठी संशोधन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. (Cochin Shipyard Share Price)
तसंही मागच्या वर्षभरात भारतीय निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढले असताना कोचिन शिपयार्ड शेअरने मात्र ३६ टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीकडे आता असलेल्या ऑर्डर बघता फक्त आनंद राठीच नाही तर नुवामा संस्थेनंही आपला सकारात्मक अहवाल दिला आहे. (Cochin Shipyard Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना शेअरमधील खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community