मुंबईहून चारधाम यात्रा करण्यासाठी पॅकेजची किंमत ही प्रवासाची पद्धत, प्रवासाचा कालावधी, राहण्याची सोय आणि तुम्ही निवडलेल्या पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टींवर अवलंबून असते. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे तपशीलवार माहिती देत आहोत. ती पुढीलप्रमाणे… (Char Dham Yatra)
(हेही वाचा – Covid चा आजार वाढल्यास उपनगरीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट होणार कार्यान्वित)
रस्त्याने चारधाम यात्रा करायची असल्यास (१० ते १३ दिवस) :
बजेट पॅकेजेस :
हे १० ते १३ दिवसांच्या टूरसाठी प्रति व्यक्ती साधारणपणे ₹१७,००० ते ₹२८,५०० एवढं सुरुवातीचं पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये परवडणाऱ्या हॉटेल्स किंवा धर्मशाळेमध्ये राहण्याची सोय केली जाते, त्यासोबतच जेवणामध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तसंच वाहतूकीमध्ये हरिद्वार/देहराडूनहून शेअर्ड बस किंवा कॅब यांचा समावेश असतो.
जसं की, काही कॅब्स कंपन्या प्रति व्यक्ती ₹१७,००० या दराने १२ दिवसांचं पॅकेज देतात. तर काही कॅब कंपन्या प्रति व्यक्ती ₹२३,५०० पासून सुरू होणारे पॅकेजेस ऑफर करतात.
मानक/डिलक्स पॅकेजेस :
या पॅकेजमध्ये १२ ते १३ दिवसांसाठी प्रति व्यक्ती ₹२५,५०० ते ₹३६,००० पर्यंत रक्कम आकारली जाते. तसंच या पॅकेजमध्ये चांगले हॉटेल्स, खाजगी कॅब जसं की, इनोव्हा किंवा क्रिस्टा आणि ड्रायव्हर कम टूर गाईड यांचा समावेश असतो. काही ट्रॅव्हल एजन्सी ₹२५,५०० ते ₹३६,००० पासून सुरू होणारे पॅकेज ऑफर करतात.
लक्झरी पॅकेजेस :
या पॅकेजमध्ये चारधाम यात्रेच्या १२ दिवसांच्या टूरसाठी प्रति व्यक्ती ₹३५,००० पासून सुरू होणारे पेकेज उपलब्ध असतात. या पॅकेजमध्ये इतर बेसिक सुविधांसोबतच प्रीमियम हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, खाजगी वाहनाने ट्रान्सफर सुविधा आणि व्ही.आय.पी. दर्शन यांसारख्या अतिरिक्त सेवांचा समावेश असतो. बऱ्याच ट्रॅव्हल एजन्सी ₹३५,००० पासून लक्झरी पॅकेजेस देण्यास सुरुवात करतात. (Char Dham Yatra)
(हेही वाचा – सोसायटीत जबरदस्तीने बकरीची कत्तल केली तर सरकार कारवाई करेल; मंत्री Nitesh Rane यांचा इशारा)
हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा करायची असल्यास (५-६ दिवस) :
हेलिकॉप्टर ने चारधाम यात्रा करायची असल्यास ५ ते ६ दिवसांच्या टूरसाठी प्रति व्यक्ती साधारणपणे ₹१.८५ लाख ते ₹२.५ लाख पर्यंत खर्च येतो. या टूर पॅकेजमध्ये डेहराडूनहून हेलिकॉप्टर ट्रान्सफर, लक्झरी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, दिवसभराच्या नाश्ता आणि जेवणाची सोय तसंच व्ही.आय.पी. दर्शन यांचा समावेश असतो. काही मोठ्या ट्रॅव्हल कंपन्या असे पॅकेजेस प्रदान करतात. पण या पॅकेजच्या किंमती टूर करण्याचा हंगाम आणि उपलब्धतेनुसार बदलत असतात.
अतिरिक्त खर्च :
चारधाम यात्रा करताना काही अतिरिक्त खर्चही येतात. जसं की…
हरिद्वार/डेहराडून प्रवास :
मुंबई ते देहराडूनपर्यंत विमान प्रवासाचा खर्च हा प्रति व्यक्ती ₹३,००० ते ₹१०,००० पर्यंत येऊ शकतो. तसंच हरिद्वार ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेनने प्रवासाचा खर्च हा सुमारे ₹१,००० ते ₹२,००० पर्यंत असू शकतो.
पोनी/पालकी सेवा :
यमुनोत्री किंवा केदारनाथ इथे ट्रेक करण्यासाठी प्रति व्यक्ती ₹२,००० ते ₹५,००० एवढा खर्च येऊ शकतो.
केदारनाथ इथे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर :
इथे प्रति व्यक्ती अंदाजे ₹७,००० ते ₹१०,००० एवढा खर्च येऊ शकतो. ( हे रोड पॅकेजमध्ये समाविष्ट नाही).
चारधाम यात्रा करताना होणारे इतर खर्च :
वैयक्तिक खर्च, विशेष दर्शन शुल्क आणि प्रवास विमा सामान्यतः वगळण्यात येतो. बायोमेट्रिक नोंदणी खर्च ₹५० अनिवार्य आहे. (Char Dham Yatra)
(हेही वाचा – Pakistan Earthquake : भूकंप ठरला कैद्यांसाठी फायद्याचा; कारागृहाच्या भिंती तोडून कैदी फरार)
काही महत्वाच्या टिपा :
- या लेखामध्ये सांगण्यात आलेल्या चारधाम यात्रा पॅकेजेसच्या किमती इंटरनेटवर असलेल्या आकलनावरून अंदाजे सांगितलेल्या आहेत. या किमती टूरचा हंगाम, प्रवास गटाचा आकार आणि ऑपरेटर ट्रॅव्हल एजन्सीनुसार बदलू शकतात.
- चारधाम यात्रेसाठी सर्वोत्तम काळ हा मे-जून किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांचा आहे. कारण या काळात चारधाम यात्रेअंतर्गत येणारी सगळी मंदिरे पर्यटकांसाठी खुली असतात. तसंच या काळात हवामानही अनुकूल असतं.
- कोणत्याही पॅकेजेसमध्ये सामान्यतः हरिद्वार किंवा देहराडूनपासून सुरू होणाऱ्या यात्रा यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचा समावेश असतो.
- चारधाम यात्रा टूर पॅकेजच्या अचूक किंमती जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही विश्वासू ट्रॅव्हल एजन्सीला संपर्क करून सविस्तर चौकशी करू शकता. (Char Dham Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community