सिलिंडरचे दर वाढले; आता गॅसशिवाय बनवा जेवण, सरकारने बाजारात आणला ‘हा’ खास स्टोव्ह

104

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एलपीजीचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे बजेट सुद्धा कोलमडले आहे. एलपीजीच्या वाढत्या किमतीतून सामान्यांची सुटका करण्यासाठी सरकारने सोलर स्टोव्ह बाजारात आणला आहे. हा स्टोव्ह घरी आणून तुम्ही अगदी सहज जेवण बनवू शकता. सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑईलने हा स्टोव्ह बाजारात आणला आहे. या सोलर स्टोव्हचे नाव सूर्य नूतन असे आहे.

( हेही वाचा : Police Bharti : राज्यात १४,९५६ जागांसाठी पोलीस भरती; ‘या’ तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया)

हा स्टोव्ह सौर ऊर्जेवर चालतो. हा सोलर स्टोव्ह उन्हात ठेवण्याची गरज नाही. स्टोव्हचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात किंवा तुमच्या सोयीनुसार करू शकता. सूर्य नूतन सोलर स्टोव्हची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याचे एक युनिट सूर्यप्रकाशात राहते आणि चार्जिंग करताना ऑनलाईन कुकिंग मोड देते. चार्ज करून सुद्धा तुम्ही हा सोलर स्टोव्ह वापरू शकता.

सूर्या नूतन स्टोव्ह हा हायब्रीड मोडवर काम करतो. सौर ऊर्जेशिवाय या स्टोव्हमध्ये विजेचा स्त्रोतही वापरता येईल. सूर्या नूतन स्टोव्ह तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. त्याचे प्रीमियम मॉडेल चार सदस्यांच्या कुटुंबासाठी पूर्ण जेवण बनवू शकते. बेस मॉडेलची किंमत १२ हजार तर टॉप मॉडेलची किंमत २३ हजार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.