• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28.2 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, June 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home लाइफ स्टाइल Cdsl Share Price : एका आठवड्यात वर्षभरातील उच्चांक आणि पुढील आठवड्यात घसरण,...
  • लाइफ स्टाइल

Cdsl Share Price : एका आठवड्यात वर्षभरातील उच्चांक आणि पुढील आठवड्यात घसरण, असा हा शेअर कुठला?

Cdsl Share Price : सीडीएसएल शेअरमध्ये या महिन्यात चढ उताराचं वातावरण आहे.

December 21, 2024
796
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Cdsl Share Price : एका आठवड्यात वर्षभरातील उच्चांक आणि पुढील आठवड्यात घसरण, असा हा शेअर कुठला?
    • ऋजुता लुकतुके

    शेअर बाजार हा मूळातच चढ उताराचा खेळ आहे. पण, गुंतवणूकदारांना हे चढ उतार नेमके का होतात याचं भान ठेवावंच लागतं. तरंच या गुंतवणुकीतून पैसे कमावता येतात. सीडीएसएल या शेअरमध्ये गेल्या महिनाभरात अशाच घडामोडी घडताना दिसल्या. त्या मागचा अर्थ समजून घेऊया. गेल्याच महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देऊ केले. तेव्हापासून अर्थातच शेअर तेजीत होता. आणि तो १,९५९ या ५२ आठवड्यातील उच्चाकांला स्पर्श करून आला. (Cdsl Share Price)

    आणि तेव्हापासून तो चढ्या भावातच ट्रेड होत होता. त्यामुळे सतत वर गेलेल्या या शेअरमध्ये थोडी नफारुपी विक्री येण्याचा अंदाज होताच. पण, या आठवड्यात अशा विक्रीबरोबरच एका काळजी करण्यासारख्या बातमीची भर पडली आणि शेअरने उच्चांकापासून जवळ जवळ १०० अंशांची घसरण पाहिली आहे. (Cdsl Share Price)

    (हेही वाचा – Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती)

    New Project 2024 12 21T183834.454

    सीडीएसएल म्हणजे सेंट्रल डीपॉझिटरी सर्व्हिसेस. आपण विकत घेतलेले डिजिटल स्वरुपातील शेअर साठवण्याचं काम ही कंपनी करते. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड तसंच इतर सेक्युरीटींच्या एकूण व्यवहारात हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या बाबतीत कंपनीची मक्तेदारीही आहे. त्यामुळे एका खराब बातमीने कायमचा कोसळेल असा हा शेअर नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या बातमीचा नकारात्मक विचार करण्याची गरज नाही. पण, बातमी अशी आहे की, सीडीएसएलकडे असलेले तुमचे शेअर विकताना दलालांना तांत्रिक अडचण येत होती. तशी बातमीच झिरोदाने ट्विट करून दिली होती. या तांत्रिक अडचणीमुळे शेअर विक्री सुरळीत होत नव्हती. (Cdsl Share Price)

    (हेही वाचा – Greaves Cotton Share Price : ग्रीव्हज कॉटन शेअरमध्ये एका आठवड्यात ३० टक्यांची वाढ; शेअरमध्ये वाढीची ३ कारणं)

    या बातमीचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसून आला आणि शुक्रवारी एकाच दिवसांत शेअर ५ टक्क्यांनी खाली आला. पण, कंपनीची तिमाही कामगिरी चोख आहे आणि कंपनीने ४९ टक्के महसूल वाढीची नोंदही केली आहे आणि कंपनीच्या विक्रीतही ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Cdsl Share Price)

    (टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Cdsl
    • Cdsl Share Price
    • investors
    • share
    • share price
    • Stock Market
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleBangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती
      Next articleMazgaon Tadwadi Redevelopment Project : रहिवाशांना विश्वासात घेतले नसल्याचा आमदार जामसुतकरांचा आरोप
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline