
ब्रोकोलीमध्ये अनेक जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ब्रोकोली खाण्याचे कित्येक फायदे आहेत. जसं की, ऍसिडिटी कमी करण्यास मदत करणं, ब्लड शुगर कंट्रोल करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं इत्यादी.
ब्रोकोली ही एक हिरवी भाजी असते. ती एका लहान झाडासारखी किंवा फ्लॉवरसारखी दिसते. ब्रोकोली ही ब्रासिका ओलेरेसिया नावाच्या वनस्पती प्रजातीशी संबंधित आहे. म्हणजेच साधारणपणे कोबी, ब्रुसेल्स स्प्राउट्स, केल आणि फुलकोबी अशा भाज्यांचा ब्रोकोलीशी जवळून संबंध आहे. या सर्व वनस्पती क्रूसिफेरस भाज्या म्हणून ओळखल्या जातात. (broccoli benefits)
(हेही वाचा – युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारी वेबसाइट शत्रूकडून लक्ष्य; Cyber सेलकडून सूचक इशारा जारी)
ब्रोकोलीचे तीन मुख्य प्रकार आहेत :
- कॅलब्रेस ब्रोकोली
- अंकुरित ब्रोकोली
- जांभळा फुलकोबी (हा ब्रोकोलीचाच एक प्रकार आहे)
ब्रोकोली खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत…
कर्करोगापासून संरक्षण होतं
ब्रोकोलीमध्ये विविध जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगं असतात. ही संयुगं काही जुनाट आजारांमुळे शरीरातल्या पेशींचं होणारं नुकसान कमी करू शकतात.
अनेक रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, क्रूसिफेरस भाज्या खाल्ल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळतं..
- स्तनाचा कर्करोग
- प्रोस्टेट कर्करोग
- जठरासंबंधी/पोटाचा कर्करोग
- कोलोरेक्टल कर्करोग
- मूत्रपिंडाचा कर्करोग
- मूत्राशयाचा कर्करोग
तरीही क्रूसिफेरस प्रजातीच्या भाज्या आणि कर्करोगाचा प्रतिबंध यांच्यातला परस्पर संबंध निश्चित करण्यासाठी आणखी संशोधन करणं गरजेचं आहे. (broccoli benefits)
(हेही वाचा – Sula Vineyard : सुला वाईन लोकांना इतकी का आवडते? कोणतं खास जिन्नस असतं त्यात जे लोकांना मोहित करतं?)
ब्रोकोली मधले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायला मदत करतात
मधुमेह झालेल्या लोकांनी ब्रोकोली खाल्ल्यास त्यांच्या रक्तातल्या अतिरिक्त साखरेला नियंत्रित ठेवण्यास मदत होते. एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यांनी एक महिना दररोज ब्रोकोली स्प्राउट्स खाल्ले तर त्यांच्या स्वादुपिंडाच्या पेशींचं नुकसान कमी झालं आहे.
ब्रोकोली हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे. आहारात फायबरचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातली अतिरिक्त साखर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. (broccoli benefits)
हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त
ब्रोकोली ही वेगवेगळ्या प्रकारे हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी मदत करू शकते. रक्तामध्ये वाढलेले वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी हे हृदयरोगासाठी प्रमुख जोखीमीचे घटक असतात. ब्रोकोली खाल्याने या घटकांना आळा बसतो.
ब्रोकोली स्प्राउट सप्लिमेंट पावडरने उपचार घेतलेल्या लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं आणि चांगल्या एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचं एका रिसर्चमधून दिसून आलं आहे. म्हणजेच ब्रोकोलीमधल्या विशिष्ट अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण एकूण कमी होऊ शकतं. (broccoli benefits)
(हेही वाचा – Trirashmi Caves : त्रिरश्मी लेण्या सांगतात बुद्ध व जैन समाजाचा इतिहास! वाचा काय आहे सत्य?)
वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते
वृद्धत्वाची प्रक्रिया ही मुख्यत्वे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि तुमच्या शरीराच्या कमी झालेल्या चयापचय क्रियेमुळे सुरू होते. वृद्धत्व ही एक अपरिहार्य नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही, तुम्ही घेत असलेल्या आहाराची गुणवत्ता ही अनुवांशिक अभिव्यक्ती आणि वयाशी संबंधित रोगांच्या विकासाचे निर्धारण करण्यात एक प्रमुख भूमिका बजावते. ब्रोकोलीमधल्या जैव-सक्रिय संयुग सल्फोराफेनमध्ये अँटिऑक्सिडंट जनुकांची अभिव्यक्ती वाढवून वृद्धत्वाची जैवरासायनिक प्रक्रिया मंदावण्याची क्षमता असते. (broccoli benefits)
ब्रोकोलीमधलं व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते
मानवी रोगप्रतिकारक शक्ती गुंतागुंतीची आहे. तिचं कार्य योग्यरित्या सुरू राहाण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात आवश्यक असलेलं पोषक तत्व आहे. ते ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन सी हे वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करण्यात आणि उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. दररोजच्या जेवणात १०० ते २०० मिलीग्राम व्हिटॅमिन सीचं सेवन करणं हे संसर्ग रोखण्यासाठी पुरेसं असतं. सामान्यतः व्हिटॅमिन सी हे संत्री किंवा स्ट्रॉबेरीमध्ये मिळतं. पण ते ब्रोकोलीमध्येही उपलब्ध असतं. (broccoli benefits)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community