
महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर या बस स्थानकापासून ३ किलोमीटर आणि नाशिकपासून ३१ किलोमीटर एवढ्या अंतरावर ब्रह्मगिरी (brahmagiri trek nashik) हा पश्चिम घाटात असलेला त्र्यंबकेश्वरला लागून असलेला एक पर्वत आहे. ब्रह्मगिरी हा पर्वत १,२९८ मीटर उंचीवर वसलेला असून इथेच पवित्र गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. ब्रह्मगिरीचा शब्दशः अर्थ म्हणजे ब्रह्मदेवाचा पर्वत असा होतो. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या या पर्वतावर राहत होते. ऋषी गौतम एका गायीला पळवून लावण्याचा प्रयत्न करताना ती गाय अनावधानाने मारली गेली. त्यानंतर आपल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी, गंगा नदीला त्याठिकाणी पाचारण करण्यासाठी महादेवांची आराधना केली. गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी गौतम ऋषींना अनावधानाने घडलेल्या पापातून मुक्त करण्यासाठी नदीला या ठिकाणी अवतारण्यास सांगितलं. म्हणूनच या पर्वतावरून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीला गौतमी नदी असंही म्हणतात. (brahmagiri trek nashik)
(हेही वाचा – mumbai zoo park : राणीच्या बागेत सुट्टीत फिरायला जायचंय ना? पाहू शकाल पेंग्विन, वाघोबा आणि विविध पक्षी; भरावे लागतील इतके पैसे)
पूर्वी ब्रह्मगिरी (brahmagiri trek nashik) पर्वताला महादेवांचं एक विशाल रूप मानलं जात असे आणि म्हणूनच तो पर्वत चढणं हे पाप मानलं जात असे. १९०८ साली सेठ लालचंद आणि सेठ गणेशदास यांनी ४०,००० रुपये खर्चून या पर्वतावर ५०० दगडी पायऱ्या बांधल्या होत्या. त्यामुळे आता ब्रह्मगिरी पर्वतावर सहज चढून जाता येतं. या पर्वतावरून तीन दिशांना पाणी वाहताना दिसतं. पूर्वेकडे वाहणारी गोदावरी नदी, दक्षिणेकडे वाहणारी वैतरणा नदी आणि पश्चिमेकडे वाहणारी गंगा नदी ही पश्चिमेकडची गंगा म्हणून ओळखली जाते. ही नदी चक्रतीर्थाजवळ गोदावरी नदीला जाऊन मिळते. तसंच अहिल्या नदी ही त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीला जाऊन मिळते. सद्यो-जटा, वामदेव, तत्-पुरुष, अघोरा आणि ईशाना ही ब्रह्मगिरी पर्वताची पाच शिखरं आहेत. या शिखरांना महादेवांची पाच मुखं मानली जातात. (brahmagiri trek nashik)
(हेही वाचा – Crime : २१ वर्षांपासून फरार साजिद अली शेख अखेर अटकेत; महिलेवर बलात्कार करून केला होता खून)
त्र्यंबकेश्वरहून ब्रह्मगिरी (brahmagiri trek nashik) पर्वताकडे जाताना १० मिनिटं चालत गेल्यावर पर्यटकांना एक बोर्ड दिसतो. त्यावर वन्य प्राण्यांची उपस्थिती आणि पर्यटकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल इशारा दिलेला आहे. त्यानंतर पुढे २ किलोमीटर पर्यंत हळूहळू चढाई करून पर्यटकांना ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर पोहोचता येतं. त्र्यंबकेश्वरहून ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यासाठी साधारणपणे २ तास लागतात. ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर महादेव आणि देवी गोदावरीची मंदिरं आहेत. गोदावरी मंदिर हे गोदावरी नदीचं उगमस्थान असल्याचे मानलं जातं. या मंदिरात गोदावरी नदी नंदीच्या मुखातून बाहेर पडताना दिसते. येथून गोदावरी नदी गंगाद्वारपर्यंत आणि नंतर पुढे त्र्यंबकेश्वर गावातल्या कुशावर्त तीर्थाकडे वाहते. इथून जवळच कोळंबिका देवी मंदिर आणि १०८ शिवलिंगांचा समूह आहे. ब्रह्मगिरी पर्वताचा खडकाळ भूभाग हा फक्त यात्रेकरूंसाठीच नाही तर निसर्ग आणि साहस प्रेमींसाठी देखील एक आकर्षण आहे. या ठिकाणी वृक्षाच्छादित जंगलांमध्ये अनेक ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. सह्याद्रीच्या या पर्वतरांगा नैसर्गिक आकर्षणे आणि निसर्गरम्य स्थळांनी समृद्ध आहेत. ब्रह्मगिरी पर्वत नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. ब्रह्मगिरी पर्वताचा देखावा डोळ्यांना आनंद देणारा आहे. (brahmagiri trek nashik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community