BMW 2 Series 2024 : बीएमडब्ल्यू २ सीरिजची नवीन कूप गाडी जूनमध्ये होणार लाँच  

BMW 2 Series 2024 : बीएमडब्ल्यू २ मालिकेला फेसलिफ्ट मिळणार आहे.

45
BMW 2 Series 2024 : बीएमडब्ल्यू २ सीरिजची नवीन कूप गाडी जूनमध्ये होणार लाँच  
  • ऋजुता लुकतुके

प्रिमिअम गाड्या आता भारतीय बाजारपेठेसाठीही अप्रूपाची गोष्ट नाहीत. बीएमडब्ल्यू, मर्सिडिझ, ऑडी या सगळ्या गाड्या जागतिक बाजारपेठेत येतात त्याच वेळी भारतातही येतात. आताही बीएमडब्ल्यू २ सीरिजची ग्रॅन कूप लाँच करताना बीएमडब्ल्यू कंपनीने ती भारतात आणण्याची तयारीही सुरू केली आहे. २०२५ च्या मध्यावर बीएमडब्ल्यूची ग्रॅन कूप गाडी लाँच होईल. या गाडीत आधीच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. (BMW 2 Series 2024)

गाडीचं इंजिन २ लीटर टर्बोचार्ज हायब्रिड इंजिन आहे आणि यातून २५५ अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण होते. ० ते ६० मैलांचा वेग ही गाडी ५.८ सेकंदात गाठू शकते. गाडीचं इंटिरिअरही आधुनिक आहे आणि टचस्क्रिन डिस्प्ले कर्व्हड असून तो १० इंच इतका मोठा आहे. आधीच्या गाडीच्या तुलनेत स्टायलिंग आणि इंटेरिअरही बदलण्यात आलं आहे. सुरुवातीला गाडीचं बदललेलं काळंभोर ग्रील तुमचं लक्ष वेधून घेतं. बीएमडब्ल्यू एम मालिकेप्रमाणे हे नवीन ग्रील आहे आणि हेड व टेल दिवे एलईडी असतील. आता २ सीरिजची भारतातील किंमतही कंपनीने उघड केली आहे. गाडीची किंमत ४२ लाख रुपयांपासून सुरू होते. (BMW 2 Series 2024)

(हेही वाचा – Polycab Share Price : पॉलीकॅबच्या शेअरमध्ये एका आठवड्यात ७ टक्क्यांची तेजी)

आधुनिक तंत्रज्ञान हा तर बीएमडब्ल्यूचा पाया आहे आणि सीरिज २ मध्ये तुम्हाला तो अनुभवता येतो. ‘हे बीएमडब्ल्यू,’ असं उच्चारल्यावर तुम्हाला आवाजाने नियंत्रित होईल अशी मदत मिळते. अगदी थंडी वाजतेय म्हटल्यावर गाडीतील तापमानही ही यंत्रणा नियंत्रित करते. त्याचबरोबर चालकासाठी आहे अशीच यंत्रणा, जी ताशी १३० किमी वेगाने जात असतानाही तुम्हाला स्टिअरिंग व्हील सोडलं तरी गाडी नीट चालवायला मदत करते. (BMW 2 Series 2024)

चालकाने मार्गिका बदलली तर ही यंत्रणा लगेच तसा इशारा देते आणि ही यंत्रणा बसवणारी बीएमडब्ल्यू ही पहिली कंपनी होती. गाडीच्या एक्सटिरिअरला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय चालकाच्या सीटमधून दिसणारं दृष्यही स्पष्ट आहे. त्यामुळे गाडीच्या अवती भवती काय घडतंय हे चालकाला लगेच आणि ठळकपणे दिसू शकतं. (BMW 2 Series 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.