Bleeding Heart म्हणजे काय? ह्रदयातून खरोखर रक्तस्राव होतो का? ख्रिस्त्यांचा देव “येशू” याच्याशी काय आहे संबंध?

19
Bleeding Heart म्हणजे काय? ह्रदयातून खरोखर रक्तस्राव होतो का? ख्रिस्त्यांचा देव "येशू" याच्याशी काय आहे संबंध?

Bleeding Heart याचा मराठी शब्दशः अर्थ शोधायला जाल तर रक्तस्राव होणारे ह्रदय असा अर्थ निघेल. मात्र याचा अर्थ अधिक खोल आहे. Bleeding Heart असलेली व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचे ह्रदय सहानुभूती आणि करुणेने भरलेले आहे. असी व्यक्ती सामाजिक किंवा मानवतावादी समस्यांबद्दल जास्त भावनिक असते.

म्हणून Bleeding Heart हा शब्द दयाळूपणा आणि उदारतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. मात्र कधीकधी अति सहानुभूती किंवा भोळेपणा, भाबडेपणा यासाठी देखील वापर केला जाऊ शकतो. म्हणजे सद्गुणविकृती दर्शवण्यासाठी देखील या शब्दाचा वापर केला जाऊ शकतो. सद्गुणविकृती म्हणजे अशा समुदायाबाबत किंवा लोकांबाबत अति सहानुभूती दाखवणे, जे अत्याचारी प्रवृत्तीचे आहेत.

(हेही वाचा – तुर्कीला आणखी एक धक्का! Mumbai IIT ने तुर्की विद्यापिठांसोबतचे सर्व शैक्षणिक करार केले स्थगित)

या (Bleeding Heart) शब्दाची उत्पत्ती सहानुभूती किंवा करुणा ही भावना अधोरेखित करण्यासाठी झाली आहे. पाश्चात्य देशात रक्तस्राव म्हणजे करुणा होय! विशेषतः ख्रिश्चन धर्मात, जिथे येशूचे “पवित्र हृदय” (Sacred Heart) बहुतेकदा रक्तस्त्राव होताना दर्शविले जाते. याचा अर्थ त्याच्या ह्रदयात मानवतेसाठी दैवी प्रेम आहे आणि येशू लोकांचे दुःख पाहून दुःखी होतो आणि त्यांना पापातून मुक्त करतो.

Bleeding Heart म्हणजे खोल करुणा आणि सहानुभूती असलेली व्यक्ती. म्हणूनच इथे येशूचे उदाहरण महत्त्वाचे आहे. असा व्यक्तींना इतरांच्या वेदना आणि संघर्षांची खोलवर जाणीव असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे Bleeding Heart हा शब्द कधीकधी व्यंग्यात्मक किंवा टीकात्मक पद्धतीने वापरला जातो. राजकीय संदर्भात विरोधक एखाद्याला “Bleeding Heart” असे म्हणू म्हणतात, याचा अर्थ अशी व्यक्ती सामाजिक मुद्द्यांबद्दल गरज असतनाही अत्याधिक भावनिक असते. व्यवहार शून्य असेही त्यांना म्हणता येईल.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल; प. पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन )

आपण पाहिलं की Bleeding Heart हा शब्द सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही संदर्भात वापरला जातो. आता हे आपल्यावर आहे की आपण हा शब्द कसा वापरावा आणि इतरांनी आपल्याला कोणत्या दृष्टीकोनातून पाहावे! तुम्हाला काय वाटतं तुम्ही Bleeding Heart आहात का?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.