Black Raisins : बेदाण्यापेक्षाही अधिक फायदेशीर ठरतात काळ्या मनुका, हाडंही होतील मजबूत

153

बेदाणे तर आपण नेहमीच खातो पण काळ्या मनुका अशाच तुम्ही खाता की नाही? वास्तविक काळ्या मनुका या काळ्या द्राक्षांपासून तयार होतात आणि बेदाण्यांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतात. काळ्या मनुकांमुळे केवळ शरीरातील रक्ताची कमतरता कमी होत नाही तर केसांपासून तुमच्या त्वचेपर्यंत याचा फायदा मिळतो. जाणून घेऊया काळ्या मनुकांचे होणारे फायदे.

काळ्या मनुकांमध्ये खास पोषक तत्व असून यामध्ये फायबर, प्रोटीन, शुगर, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन आणि लोह आढळते. यामुळे ब्लड प्रेशर, हार्ट, पोट, हाडे, त्वचा आणि केस अशा अनेक समस्या दूर राहतात.

१) हृद्यविकाराचा धोका कमी करते

काळ्या मनुकात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हृदयाला बळ देते व हृदय विकारांचे प्रमाण कमी करते. याशिवाय काळ्या मनुकात असणाऱ्या Resveratrol ह्या घटकामुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो, रक्तात गुठळ्या होत नाही, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने काळ्या मनुकामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

२) हिमोग्लोबिन व रक्त वाढवते

काळ्या मनुक्यात लोह व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडासा लिंबूरस घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत. यामुळे रक्तारील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर रक्त शुद्ध होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते.

३) डोळ्यांचे आरोग्य सुधारते

काळ्या मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही त्यामुळे अकाली अंधत्व येण्यापासून बचाव होतो.

४) डायबेटीससाठी योग्य

काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. शिवाय काळ्या मनुकांचा Glycemic index 70 पेक्षाही कमी असल्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य ठरतात.

५) अशक्तपणा दूर होतो

दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाल्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

६) पोट साफ होते

काळ्या मनुका सारक गुणांच्या असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका पाण्यात भिजवून रात्री खाल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.

७) पित्त कमी करते

काळ्या मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.