Bhigwan Bird Sanctuary : फ्लेमिंगो पक्षी पाहायचे असतील तर भिगवण पक्षी अभयारण्याला या महिन्यात भेट द्या

39
Bhigwan Bird Sanctuary : फ्लेमिंगो पक्षी पाहायचे असतील तर भिगवण पक्षी अभयारण्याला या महिन्यात भेट द्या

भिगवण पक्षी अभयारण्याला “महाराष्ट्राचं भरतपूर” असंही म्हटलं जातं. हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातल्या भिगवण शहराजवळ, पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर वसलेलं एक प्रसिद्ध असलेलं पक्षी निरीक्षण स्थळ आहे. हे पक्षी अभयारण्य भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणाच्या, म्हणजेच भीमा तलावाच्या बॅकवॉटरच्या काठावर वसलेलं आहे. (Bhigwan Bird Sanctuary)

(हेही वाचा – satara bus stand : सातारा बसस्थानकातून सुटणार्‍या गाड्यांचं वेळापत्रक)

भिगवण पक्षी अभयारण्याची प्रमुख वैशिष्ट्ये

ठिकाण :

हे पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात भिगवण इथे कुंभारगाव आणि डिकसाळ नावांच्या गावांजवळ वसलेलं आहे.

परिसंस्था (जीवनचक्र) :

हे अभयारण्य उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पसरलेलं असल्यामुळे इथे असलेलं दलदलीचं ओलं मैदान, काही प्रमाणात गवताळ प्रदेश आणि उथळ पाणी हे वेगवेगळ्या प्रकारच्या निवासी आणि स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करतं.

क्षेत्रफळ :

भिगवण पक्षी अभयारण्य हे अधिकृतपणे नियुक्त केलेलं अभयारण्य नसलं तरीही, धरणाच्या बॅकवॉटरभोवतीचा अंदाजे १८,००० हेक्टर एवढा प्रदेश हा सर्व पक्ष्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिवास बनला आहे. (Bhigwan Bird Sanctuary)

(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमाने जगातील सगळ्या लीगना टाकलं मागे)

पक्ष्यांच्या प्रजाती :

भिगवण पक्षी अभयारण्य इथे २६० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. ज्यांमध्ये पुढील काही प्रजातींचा समावेश आहे.

स्थलांतरित पक्षी :

ग्रेटर फ्लेमिंगो, बार-हेडेड गिज, रडी शेल्डक्स, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न शोव्हेलर्स, सँडपाइपर आणि स्टिंट सारख्या वेगवेगळ्या वॅडर.

निवासी पक्षी :

इंडियन पॉन्ड हेरॉन, ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट, रिव्हर टर्न आणि ग्रे हेरॉन. तसंच विशेषतः फ्लेमिंगो पाहण्यासाठी पर्यटक इथे हिवाळ्यात गर्दी करतात. या काळात फ्लेमिंगोचा गुलाबी पिसारा एक प्रमुख आकर्षण असतो.

वन्यजीव :

भिगवण पक्षी अभयारण्यात फक्त पक्षांव्यतिरिक्त मासे, लहान सस्तन प्राणी आणि जलचर वनस्पतींनाही मोठा आधार मिळालेला आहे. जे जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आपापलं योगदान देतात. (Bhigwan Bird Sanctuary)

(हेही वाचा – solar light for home : घरात सोलार दिवे लावल्याने विजेची बचत होते का? जाणून घेऊया गैरसमज आणि तथ्य)

भिगवण पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता?

भिगवण पक्षी अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते मार्च या हिवाळ्यातल्या महिन्यांत असतो. त्याचं कारण असं की, या काळामध्ये फ्लेमिंगो, बार-हेडेड हंस, रडी शेल्डक आणि सायबेरियन क्रेनसारख्या असंख्य स्थलांतरित पक्ष्यांचं इथे आगमन होतं. त्यांमुळे हे पक्षी अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी एक आदर्श ठिकाण बनतं.

याव्यतिरिक्त हिवाळ्यात इथलं हवामान आल्हाददायक असतं. या काळात इथलं तापमान १०°C ते २५°C पर्यंत असतं. त्यामुळे बोटी चालवणं आणि छायाचित्रण करणं यांसारख्या कित्येक गोष्टी तुम्ही करू शकता. विशेषतः जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात. म्हणून या दोन महिन्यांत पर्यटक इथे खूप गर्दी करतात. (Bhigwan Bird Sanctuary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.