
भविष्य मलिकामध्ये आपल्या भविष्याबद्दल जे काही लिहिले गेले आहे ते आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खरे ठरत आहे. २०२५ मध्ये काय होईल याची आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे भविष्य मालिका? (bhavishya malika)
भविष्य मलिका हा ओडिया भाषेत लिहिलेला ६०० वर्षे जुना ग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवनाच्या विविध पैलूंबद्दल भाकिते आहेत, ज्यात तांत्रिक प्रगती, आध्यात्मिक ज्ञान आणि जागतिक घटनांचा समावेश आहे. हा एक महत्त्वाचा ज्योतिषीय ग्रंथ मानला जातो. ज्याचा उद्देश कलियुगाच्या शेवटी होणाऱ्या मोठ्या विनाशापूर्वी भक्तांना मार्गदर्शन करणे आहे. “भविष्य मलिका” या शब्दाचे भाषांतर “भविष्यवाणींची यादी” असे केले जाते. कोविड-१९ साथीचा रोग आणि भू-राजकीय संघर्ष यासारख्या त्याच्या अनेक भाकिते खऱ्या ठरल्या आहेत. (bhavishya malika)
(हेही वाचा – Solapur मध्ये टॉवेल कारखान्याला आग; होरपळून तिघांचा मृत्यू)
या पुस्तकात भविष्यात भारत आणि चीनमधील युद्धाच्या शक्यतांबद्दल देखील लिहिले आहे. २०२४ आणि त्यापूर्वीचे वर्ष म्हणजेच २०२३ हे भविष्य मलिकामध्ये कृष्ण बाद असे म्हटले गेले आहे. यामध्ये ‘कृष्ण क्रमांक मसीहा’ २०२३ ही महत्त्वाची भूमिका मानली गेली आहे आणि असेही म्हटले गेले आहे की हे वर्ष कलियुगात विशेष बदल आणणार आहे. (bhavishya malika)
भविष्य मलिकानुसार या वर्षी शनिदेव पूर्णपणे मीन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे संपूर्ण जगात मोठे बदल घडतील. २०२५ मध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडण्याची अपेक्षा आहे, विशेषतः मीन राशीत शनि योगाच्या प्रभावामुळे. हा दुर्मिळ योगायोग जागतिक स्तरावर गंभीर बदल घडवून आणू शकतो. भविष्य मलिकानुसार २०२५ पासून जागतिक स्तरावर महागाई वेगाने वाढेल, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडू शकतात. तसेच व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत मोठी अस्थिरता निर्माण होईल, ज्यामुळे जागतिक आर्थिक संकट आणि आर्थिक अनिश्चितता निर्माण होऊ शकते. (bhavishya malika)
(हेही वाचा – Donald Trump यांच्या सल्लागार मंडळात दोन जिहादी; एक लष्कर ए तोयबाचा तर दुसरा…)
आपल्याला कोरोनाने ग्रासलं होतं. मात्र आता कोरोनापेक्षाही धोकादायक आजार पसरु शकतो ज्यावर कोणताही इलाज शक्य होणार नाही. डॉक्टर आणि वैद्य या आजाराची ओळख पटवू आणि समजून घेऊ शकणार नाहीत आणि दिलेली औषधे कुचकामी ठरतील. वात, कफ आणि इतर असाध्य आजारांमुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईल. जग होरपळून निघणार आहे. (bhavishya malika)
अलिकडच्या घटनांवर नजर टाकली तर २०१८ पासून जगभरात जंगलातील आगीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. आई हिंगुला भवानीचा कोप जगात पसरेल आणि कोणीही कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणी आग लागेल असा उल्लेख भविष्य मालिकेत आहे. गेल्या काही वर्षांत अॅमेझॉन, कॅनडा आणि अमेरिकेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. देव गुप्त लीला करतील, ज्या फक्त खऱ्या भक्तांनाच समजतील. या काळात, ६४ योगिनी माता आणि चामुंडा मातेचे विनाशकारी रूप प्रकट होईल आणि विनाश सुरू होईल. पशुबळी देण्याच्या वाढत्या प्रथेमुळे देवींचा क्रोध वाढेल, ज्यामुळे अज्ञात आणि रहस्यमय घटना घडतील. (bhavishya malika)
(हेही वाचा – Madh Fort : मुंबईचं मढ आयलॅंड म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना; या शांत ठिकाणी येऊन व्हाल प्रसन्न)
याचे अत्यंत गंभीर परिणाम दिसून येणार आहेत. काही लोकांना अज्ञात आवाज ऐकू येतील, ज्यामुळे त्यांच्या कान, नाक आणि तोंडातून रक्त वाहू शकते. २०२५ नंतर, कॅलिफोर्नियासारख्या भागात भयानक आगी लागतील, ज्या नियंत्रित करणे खूप कठीण होईल. भूकंप, पूर आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वाढीला लागतील. रस्ते, रेल्वे आणि हवाई अपघातांमध्ये अनपेक्षित वाढ होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल. (bhavishya malika)
आता तुम्हाला प्रश्न पडला असे की इतक्या भयानक गोष्टी घडणार आहेत तर विश्वयुद्ध सुद्धा होणार का? तर भविष्य मलिका अनुसार २०२५ नंतर अनेक युद्धे होतील आणि तिसरे महायुद्ध देखील होईल. तिसऱ्या महायुद्धात अनेक देश एकमेकांविरुद्ध लढतील. यापैकी एक युद्ध भारत आणि १३ इस्लामिक देशांमध्ये देखील होईल. भविष्य मलिकाच्या मते, तिसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर देखील केला जाईल, ज्यामुळे व्यापक विनाश होईल. कदाचित या युद्धांमध्ये भारत निर्णायक भूमिकेत असेल. (bhavishya malika)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ स्थगित असतानाच भारतीय सैन्यदलाला आणखी ४० हजार कोटींची संरक्षण सामुग्री)
यावर उपाचर हवा असेल तर तो तुम्हाला बाहेर सापडणार नाही. अधिकाधिक अध्यात्मिक वृत्ती धारण करणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. काली, महाकाल, कालभैरव, ओरत्यंगिरा, दश महाविद्या अशा उग्र देवतांची उपासना गुरुंच्य मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. हिंदुस्थानाने अधिकाधिक उपासना केली तर कमीतकमीत नुकसान होईल आणि प्रगती होईल… (bhavishya malika)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community