
मुंबईतील अंधेरी पश्चिममधील Bhavan’s Nature and Adventure Centre हे निसर्ग शिक्षण, साहसी उपक्रम आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी समर्पित एक अद्वितीय ठिकाण आहे. पर्यटकांना इथे विविध अनुभव मिळतो. एक दिवस पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात लीन होतात. (Bhavan’s Nature and Adventure Centre)
(हेही वाचा – Operation Sindoor : जैश ए मोहम्मद, लश्कर ए तोयबाचे तळ उद्ध्वस्त! पहा PHOTOS)
उपक्रम आणि अनुभव :
निसर्ग शिक्षण :
वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जाणून घेता येते.
साहसी उपक्रम :
झिपलाइनिंग, धनुर्विद्या, मड प्ले आणि बरेच काही.
प्राणी संवर्धन सत्रे :
ससे, हेजहॉग आणि गिनी पिग सारख्या बचाव केलेल्या प्राण्यांशी संवाद साधता येतो. आपल्यालाही प्राण्यांची भाषा शिकता येते. (Bhavan’s Nature and Adventure Centre)
नाईट कॅम्प :
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुम्ही मुंबईतच सुरक्षित कॅम्पिंगचा अनुभव घेऊ शकता.
वाढदिवस आणि कॉर्पोरेट कार्यक्रम :
ग्रूप बुकिंग करुन तुम्ही विशेष पॅकेजेस मिळवू शकता आणि तुमचा वाढदिवस इथे साजरा करु शकता. तसेच कॉर्पोरेट कार्यक्रमांनाही इथे चांगला वाव आहे.
(हेही वाचा – Gaganyan : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम अंतिम टप्प्यात, अंतराळ राज्यमंत्री म्हणाले…)
वेळा आणि प्रवेश शुल्क :
रविवारी दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुले.
प्रवेश शुल्क : प्रति व्यक्ती ₹२५० (३ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील).
विशेष भेटी :
आगाऊ बुकिंगसह शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट गटांसाठी उपलब्ध. (Bhavan’s Nature and Adventure Centre)
(हेही वाचा – Operation Sindoor : मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं ! पहलगाम हल्ल्याला भारताचे चोख उत्तर)
स्थान आणि संपर्क :
पत्ता : भवन्स कॅम्पस, न्यू दादाभाई रोड, ओल्ड डी एन नगर, मुन्शी नगर, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००५८, भारत.
फोन : ८६५५६११९८८
अधिक माहितीसाठी : https://wild-holidays.com/bnac/
हेही पहा –
Join Our WhatsApp Community