best beach resorts in goa for couples : तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवायचेत? मग हे आहेत गोव्यातील best beach resorts

68
best beach resorts in goa for couples : तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवायचेत? मग हे आहेत गोव्यातील best beach resorts

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत गोव्याच्या रोमँटिक वातावरणात शांतपणे सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे का? तर दक्षिण गोव्यात असलेल्या शांत आणि कमी गर्दी असलेल्या समुद्र किनाऱ्यांशिवाय इतर कसलाही विचार करू नका. अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाणारे, दक्षिण गोव्यातले समुद्र किनारे आणि आसपासचा परिसर अविस्मरणीय अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या कपल्ससाठी परिपूर्ण आहेत. ते कोणते समुद्र किनारे आहेत ते पाहुयात… (best beach resorts in goa for couples)

पालोलेम बीच

कपल्ससाठी सर्वोत्तम समुद्र किनाऱ्यांच्या यादीत दक्षिण गोव्यात असलेलं पालोलेम बीच हे सर्वांत पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रकोरीच्या आकाराचा हा समुद्र किनारा त्याच्या शांत वातावरणासाठी आणि आल्हाददायक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार पाम वृक्षांनी वेढलेल्या या समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर शहराच्या गजबजाटातून सुटका मिळते. या समुद्र किनाऱ्यावर कपल्स आरामात फिरायला जाऊ शकतात. तसंच इथे जेवण करू शकतात. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी डॉल्फिन पाहण्यासाठी बोट राईडचाही आनंद घेऊ शकतात. (best beach resorts in goa for couples)

(हेही वाचा – Mahalaxmi Racecourse : फक्त ३०० रुपयांत पाहू शकता मुंबईत घोड्यांची शर्यत; महालक्ष्मी रेसकोर्सचा इतिहास घ्या जाणून)

अगोंडा बीच

दक्षिण गोव्यातला एक सुप्त असा अगोंडा बीचबद्दल म्हणता येईल. हा समुद्र किनारा कपल्सना वेळ घालवण्यासाठी एक शांत ठिकाण आहे. या समुद्र किनाऱ्यावर सोनेरी रंगाची वाळू आहे. सौम्य लाटा आणि तुलनेने कमी पर्यटक यामुळे कपल्सना वेळ घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर असलेल्या आरामदायी खोल्या आणि कॉटेज भाड्याने मिळू शकतात. कपल्स या समुद्र किनाऱ्यावर दूरवर चालण्याचा आणि इथल्या शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकतात. (best beach resorts in goa for couples)

बटरफ्लाय बीच

इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा वेगळा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या कपल्सनी बटरफ्लाय बीचला नक्कीच भेट द्यायला हवी. बटरफ्लाय बीच हे दक्षिण गोव्यातल्या सर्वांत गुप्त समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. या ठिकाणी फक्त एका छोट्या ट्रेक किंवा बोट राईडनेच पोहोचता येतं. इथला एकांत परिसर आणि अरबी समुद्राचं रोमांचक दृश्य हे कपल्सना एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी या किनाऱ्याला एक परिपूर्ण ठिकाण बनवतं. (best beach resorts in goa for couples)

(हेही वाचा – India Pak War Update : कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकचा खोट्या दाव्याचा बुरखा टराटरा फाडला; फोटो दाखवत केली पोलखोल)

कोला बीच

कोला बीच हा दक्षिण गोव्यातला आणखी एक सुप्त खजिना आहे असं म्हणता येईल. हा समुद्र किनारा पर्यटकांची गर्दी आणि गजबजाटापासून खूप दूर आहे. या समुद्र किनार्‍यावर पाम वृक्षांच्या रांगा आहेत. तसंच इथे शुद्ध पाणी, शांत परिसर आणि गोड्या पाण्याचं सरोवरही आहे. कपल्सना एकमेकांसोबत निवांत क्वालिटी टाईम स्पेन्ड करण्यासाठी कोला बीच हे एक आदर्श ठिकाण आहे. (best beach resorts in goa for couples)

गलगीबागा बीच

गलगीबागा बीच हा त्याच्या निरभ्र सौंदर्यासाठी ओळखला जाणारा समुद्र किनारा आहे. तसंच निवांत वेळ हवा असणार्‍या कपल्ससाठी हा किनारा एक उत्तम पर्याय आहे. इथलं शांत वातावरण आणि मऊशार वाळू एक रोमँटिक वातावरण तयार करते. असं वातावरण नवविवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी चांगलं आहे. या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातीही पाहायला मिळतात. (best beach resorts in goa for couples)

(हेही वाचा – Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा युद्धावर होतोय इतका खर्च, पाकिस्तान दिवाळखोरीकडे)

अरोसिम बीच

दक्षिण गोव्याच्या रमणीय किनारपट्टीवर वसलेलं अरोसिम बीच हे गर्दीच्या आणि गजबजाटाच्या जीवनाला जरा विराम देण्याचं काम करतं. या समुद्र किनाऱ्यावरची सोनेरी वाळू, स्फटिकासारखं स्वच्छ पाणी आणि डोलणाऱ्या ताडाच्या झाडांनी भरलेला हा समुद्र किनारा कपल्सना आरामदायी दिवस घालवण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.

गोव्यातल्या इतर लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेने हा समुद्र किनारा कमी गर्दीचा आहे. त्यामुळे काही काळ शांततेचा अनुभव घेणाऱ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. अरोसिम बीचवरचं शांत आणि स्वच्छ पाणी हे पोहण्यासाठी आणि सनबाथ घेण्यासाठी परिपूर्ण आहे. तर इथली मऊ वाळू मुलांसोबत फिरण्यासाठी किंवा वाळूचे किल्ले बांधण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. याव्यतिरिक्त या समुद्र किनाऱ्यावर थ्रिल शोधणाऱ्यांसाठी पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंगसारखे वॉटर स्पोर्ट्सही उपलब्ध आहेत. सूर्यास्ताचं सुंदर दृश्य आणि स्वादिष्ट गोवन पद्धतीच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या अनेक शॅकमुळे अरोसिम बीचवर गोव्याच्या खऱ्या अन्न संस्कृतीचा अनुभव घेता येतो. (best beach resorts in goa for couples)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.