Beauty Tips : आंघोळीच्या पाण्यात ‘या’ रसाचे थेंब मिसळा, शरीराला होतील अनेक फायदे

लिंबामध्ये 'सी' जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते.

115
Beauty Tips : आंघोळीच्या पाण्यात 'या' रसाचे थेंब मिसळा, शरीराला होतील अनेक फायदे
Beauty Tips : आंघोळीच्या पाण्यात 'या' रसाचे थेंब मिसळा, शरीराला होतील अनेक फायदे

रोजच्या आंघोळीच्या पाण्यांत देखील लिंबाच्या रसाचा (Multiple benefits of bath with Lemon) वापर नक्कीच करु शकता. आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर केल्याने आपल्याला त्याचे कोणते फायदे (Beauty Tips) होतात, ते पाहूयात –

दररोज २ ते ३ थेंब लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात घाला. दररोज आठवडाभर हा उपाय केल्यास त्वचेवरील तेलकटपणा दूर व्हायला मदत होईल.

लिंबाचा रस (Lemon juice) घालून आंघोळ केल्याने शारीरिक थकवा दूर होऊन दिवसभर उत्साह वाढतो. ताजेतवाने वाटते.

काही जणांच्या अंगाला घामाचा दुर्गंध येतो. सतत अंगाला येणारा घामाच्या दुर्गंधामुळे चारचौघात शरमल्यासारखे होते. लिंबाच्या रसात अॅसिडिक तत्त्व असतात. यासोबत अँण्टीसेप्टिक गुणधर्मही असतात. लिंबाच्या रसाचा नियमित वापर केल्याने शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी (Odor of sweat) कमी होण्यास मदत होते.

(हेही वाचा – Beauty Tips : भृंगराज तेलाला केशराज म्हणतात, केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या )

लिंबामध्ये असणारे सायट्रिक अॅसिड (Citric acid) त्वचेवर ब्लिचप्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचेवरील मुरुमं, पुटकुळ्यांचे काळे डाग कायमचे निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.

– लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्याने त्वचेवरील वाढत्या वयाच्या म्हणजेच एजिंगच्या खुणा किंवा त्वचेवरील बारीक सुरकुत्याही कमी व्हायला मदत होते.

– लिंबामध्ये ‘सी’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याच्या वापराने त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर व्हायला मदत होते. यामुळे त्वचा अधिकाधिक सुंदर दिसू लागते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.