-
ऋजुता लुकतुके
बजाज ऑटो या देशातील प्रथम क्रमांकाच्या टू-व्हीलर उत्पादक कंपनीने काळाबरोबर बदलताना आपल्या चेतक ब्रँडमध्येही मूलभूत बदल केले आहेत. या बदलांसह नवीन ३५ मालिकेच्या वितरणासाठी कंपनी तयार झाली आहे. कंपनीच्या बजाज चेतक ३५०१, ३५०२ आणि ३५०३ या नवीन दुचाकी भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज आहेत. पैकी पहिल्या दोन दुचाकीचं लोकांसमोर अनावरण झालं आहे. तर तिसरी इलेक्ट्रिक ३५०३ त्याच प्रतीक्षेत आहे. बजाज चेतकची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे तिच्याकडे लोकांचं तिच्याकडे लक्षही आहे. त्यामुळेच अलीकडे भारतीय रस्त्यांवर तिचं टेस्ट ड्राईव्ह सुरू असताना ती लोकांना दिसली तेव्हा ती ही एक बातमीच झाली. (Bajaj Chetak 3503)
बजाज चेतकचं डिझाईन आता बदललं आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न यात केलेला दिसत आहे. त्यामुळे दुचाकीच्या आतल्या बाजूला असलेलं प्लास्टिक हे काळ्या रंगाचं आहे आणि या रचनेत कुठलाही बदल झालेला नाही. गाडीचा आरसाही आधीच्या चेतक गाडीसारखाच आहे. अर्थात, इलेक्ट्रिक गाडीच्या वरच्या मॉडेलमध्ये तुम्हाला नवीन रंगसंगती आणि आधुनिक डिस्प्ले दिसू शकेल. (Bajaj Chetak 3503)
(हेही वाचा – English Premier League : लिव्हरपूलला २० वे प्रिमिअर लीग विजेतेपद, मँचेस्टर युनायटेडशी बरोबरी)
Bajaj Chetak 3503: The Future of Urban Electric Mobilityhttps://t.co/1BiXCTFcey#BajajChetak3503 #ChetakElectric #BajajAuto #ElectricScooter #EVRevolution #SustainableMobility #UrbanCommuting #ChetakSeries #ElectricVehicles #GreenRides #EVCharging #SmartScooter @guru_drive pic.twitter.com/LJdwd6rsax
— TestDriveGuru (@guru_drive) March 15, 2025
सध्या समोर आलेल्या बजाज चेतक ३५०३ ला मधोमध एलसीडी डिस्प्ले आहे. पण, आधी म्हटल्याप्रमाणे, अधिक वरच्या मॉडेलमध्ये हा डिस्प्ले रंगीत आणि टीएफटी काचेचा असेल. या डिस्प्लेमध्ये गाडीचा वेग, बॅटरीची क्षमता, वेळ, विविध मोड तसंच नकाशाही दिसू शकेल. तसंच हा डिस्प्ले तुम्ही ब्लूटूथने मोबाईलला जोडू शकाल. त्यामुळे अगदी फोनवरील संदेशही तुम्हाला इथे बघता येतील. (Bajaj Chetak 3503)
या दुचाकीमध्ये तुम्हाला एलईडी दिव्यांचाही पर्याय मिळू शकेल. बजाज चेतकचं सगळ्यात वरचं मॉडेल चावीशिवाय काम करेल, असा अंदाज आहे. पण, सध्या जे रस्त्यांवर दिसतंय त्यात चावी लावलेली आहे. मार्च महिन्यापासून या दुचाकीचं भारतीय रस्त्यांवर टेस्ट ड्राईव्ह सुरू आहे. तर ३५ मालिकेतील इतर दोन मॉडेल लाँचही झाली आहेत. आता ३५०३ ची प्रतीक्षाही लवकरच पूर्ण होणार असं समजतंय. ही दुचाकी १,१०,००० रुपयांपासून सुरू होईल, असं बोललं जात आहे. (Bajaj Chetak 3503)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community