Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिरातल्या शिवलिंगाचा शोध लावला होता एक गाईने! विश्वास बसत नसेल तर हा लेख वाचा

47
Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिरातल्या शिवलिंगाचा शोध लावला होता एक गाईने! विश्वास बसत नसेल तर हा लेख वाचा

बाबुलनाथ मंदिर हे मुंबई इथलं महादेवांचं एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गिरगाव चौपाटी जवळच्या एका लहान टेकडीवर वसलेलं आहे. हे शहरातल्या सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. बाभळीच्या वृक्षाच्या रुपात असलेल्या महादेवांचं हे मंदिर आहे. बाभळीला हिंदी भाषेत बबूल असं म्हणतात. म्हणजेच बबूलनाथ आणि पुढे त्याचा अपभ्रंश जाऊन बाबूलनाथ असं या मंदिराचं नाव प्रसिद्ध झालं. भक्तगण या मंदिरात महादेवांचं शिवलिंगाच्या रुपात दर्शन घ्यायला येतात. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्टचीही सोय आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त लाखो भक्तगण या मंदिराला भेट द्यायला येतात. (Babulnath Temple)

(हेही वाचा – bandra station : महाराष्ट्रातलं तिसरं व्यावसायिक केंद्र; वांद्रे आहे कलाकारांची नगरी!)

बाबूलनाथ मंदिराचा इतिहास

पहिल्यांदा हे मंदिर बांधलं तेव्हा ही जमीन पारशी समुदायाची होती. या परिसरात ५ दखमा होते. त्याकाळी मंदिर बांधण्यासाठी पारशी समुदायाकडून बराच विरोध झाला. पण नंतर १८०० सालच्या अखेरीस न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निकाल दिला. अशाप्रकारे हे मंदिर उभं राहिलं. (Babulnath Temple)

(हेही वाचा – बँकॉक येथून मुंबईत Drugs तस्करीसाठी भारतीय महिलांचा वापर)

जुनं बाबूलनाथ मंदिर

त्या काळातल्या हिंदू व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच बाबुलनाथ मंदिर बांधलं होतं. १८९० मध्ये बडोदा राज्यातल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या देणगीने या ठिकाणी एक मोठं मंदिर बांधलं गेलं. सध्याची मंदिर रचना ही १८९० सालची आहे. १८९० साली हे मंदिर पुन्हा बांधलं तेव्हा मंदिराची उंची बरीच होती. पण पुढे १९६० सालच्या दशकामध्ये वीज पडल्यामुळे मंदिराचा घुमट उध्वस्त झाला. त्यामुळे सध्या असलेल्या मंदिराची उंची बरीच कमी आहे. (Babulnath Temple)

सुरुवातीच्या काळात या मंदिरात योगीगण येत असत. ते इथे “ध्यान” करण्यासाठी राहत असत. तसंच इथे असलेल्या शिवलिंगाच्या स्पंदनांच्या सान्निध्यात शांतपणे वेळ घालवत असत. पुढे २० व्या शतकामध्ये हे मंदिर प्रसिद्ध झालं. आता दर सोमवारी, महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यांत या मंदिरात भक्तगणांची गर्दी असते. (Babulnath Temple)

(हेही वाचा – Pahalagam Attack मध्ये ठार शुभमची पत्नी म्हणाली, बदला घ्या!, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले ‘हे’ आश्वासन)

मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिराबद्दल असलेली आख्यायिका

असं म्हणतात की, सुमारे दोन शतकांपूर्वी मलबार हिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशाचा आग्नेय भाग हा पांडुरंग नावाच्या एका श्रीमंत सोनाराचा होता. इथे जवळच त्याची गुरंढोरं चरत होती. (Babulnath Temple)

एकदा असं लक्षात आलं की, कपिला नावाच्या गायीने दूध देणं बंद केलं आहे. पांडुरंगाच्या गुरांची राखण करणाऱ्या माणसाचं नाव बाबूल असं होतं. पांडुरंगाने बाबुलकडे कपिला गायीबद्दल चौकशी केली असता, त्याने सांगितलं की, ती गाय घरी येण्यापूर्वी एका ठिकाणी थांबते आणि स्वतःहून दूध देते. (Babulnath Temple)

दुसऱ्या दिवशी पांडुरंगाने स्वतः ते दृश्य पाहिलं. त्यानंतर पांडुरंग कपिला गाय दूध देते त्या ठिकाणी पोहोचला. तिथे पोहोचल्यावर एक मोठं शिवलिंग सापडलं. त्याच ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं आहे. (Babulnath Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.