Audi Q5 2026 : ऑडीची क्यू ५ गाडी म्हणजे आधीच्याच गाडीचं सरस व्हर्जन

Audi Q5 2026 : क्यू ५ ही ऑडी कंपनीची मध्यम आकाराची एसयुव्ही गाडी आहे. 

23
Audi Q5 2026 : ऑडीची क्यू ५ गाडी म्हणजे आधीच्याच गाडीचं सरस व्हर्जन
  • ऋजुता लुकतुके

हल्ली इलेक्ट्रक गाड्यांच्या निमित्ताने गाड्यांच्या डिझाईनमध्ये वेगवेगळे बदल होत असताना प्रिमिअम श्रेणीतील कार बनवणाऱ्या ऑडीने जुनीच परंपरा कायम ठेवून नवीन क्यू ५ मध्ये फक्त कामगिरीच्या दृष्टीने बदल केले आहेत. पण, त्यातूनही कंपनीने ऑडीचा दर्जा आणल्यामुळे ही गाडीही या श्रेणीतील खास अशीच गाडी असणार आहे. नवी क्रांती घडवण्यापेक्षा आधीपासून आपल्याकडे आहे त्यात चांगले बदल करण्याचं धोरण या गाडीतून दिसतं. (Audi Q5 2026)

(हेही वाचा – Sports Shoe For Men : मुलांसाठीचे स्पोर्ट्स शू किती रुपयांपासून सुरू होतात?)

ही गाडी अजून भारतात आलेली नाही. पण, जगभरात ती लोकांनी चालवली आणि अनुभवली आहे. त्यामुळे तिची नेमकी कल्पना भारतातही लोकांना आली आहे. एसयुव्ही बाजारपेठेतील मध्यम आकाराची ही गाडी आहे. गाडीच्या पुढचं एकसंध ग्रील, खिडक्यांची रचना यामुळे बाहेरून लगेचच ही ऑडी कार असल्याची खात्री पटते. पण, नवीन क्यू ५ मध्ये बदलली आहे ती दिव्यांची रचना. ती मात्र अत्याधुनिक आहे. हेड आणि टेल लाईटना वेगळा आकार आहे आणि दिव्यांची माळ अखंड पसरलेली आहे. तर गाडीची आतील रचना ही बहुतांश ए६ आणि क्यू६ इट्रॉन गाड्यांप्रमाणे आहे. गाडीतील चालकासमोरचा डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट डिस्प्ले हे तांत्रिक दृष्ट्या अत्याधुनिक आहेत. (Audi Q5 2026)

(हेही वाचा – Beetroot Benefits : काय आहेत बिटरुट खाण्याचे फायदे? यामुळे खरोखर तुमचा स्टॅमिना वाढतो का??)

गाडीतील साऊंड सिस्टिम नवीन आहे. तुम्ही डिजिटल डिस्प्लेला आवाजाने कमांड देऊ शकता. तसंच गाडीतील सीटही व्हेंटिलेटेड आहेत. चालकाच्या मागच्या बाजूची सीट ही थोडी वरती उचललेली आहे आणि बसण्यासाठीही ही सीट आरामदायी आहे. गाडीची बूट स्पेस एकूण ५२० लीटरची आहे. त्यामुळे ही गाडी प्रशस्त आहे हे नक्की. ही गाडी हायब्रीड असल्यामुळे यात इंधनाच्या टाकीबरोबरच बॅटरीही आहे. गाडीत २.० लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ७ स्पीड डुआल स्पीड क्लच आहे. इंजिनमुळे इंधनाची बचतही शक्य आहे. ही गाडी चांगली सरासरीही देईल असा जाणकारांचा होरा आहे. एका लीटरमागे ही गाडी १३ ते १४ किमी पळेल असा अंदाज आहे. क्यू ५ गाडी भारतात स्पोर्ट्सबॅक प्रकारातही मिळणार आहे. मर्सिडीज जीएलसी आणि बीएमडब्ल्यू एक्स३ या गाड्यांशी तिची स्पर्धा असणार आहे आणि गाडीची सुरुवातीची किंमत ७५ लाख रुपयांपासून असेल. (Audi Q5 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.