फळ आहे की सोनं? ‘या’फळाची किंमत फक्त २० लाख रुपये

119

आंबा हे महाराष्ट्राचं आवडतं फळ. त्यात हापुस असेल तर विचारायलाच नको. मे महिन्यात हापुसला खूप मागणी असते. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही हापुस आंबा खाल्ला जातो. त्यावेळी या आंब्याचे भाव गगनाला भिडलेले असतात. आम्ही तुम्हाला जपानच्या अशा फळाबद्दल सांगणार आहोत, ज्या फळाचे भाव लाखांमध्ये आहेत.

या फळाला युबारी मेलन असं म्हणतात. हे जगात सर्वात महाग फळ आहे. जपानमधील श्रीमंत लोकांमध्ये या फळाची प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे या फळाची किंमत इतकी आहे की या किंमतीत तुम्ही एक साधं घर किंवा चांगली अत्याधुनिक गाडी विकत घेऊ शकता किंवा हे पैसे एफडीमध्ये ठेवून चांगलं व्याज मिळवू शकता.

(हेही वाचा काँग्रेसच्या खोडसाळपणाचा भाजपच्या नेत्यांनी घेतला खरपूस समाचार)

प्रति किलो २० लाख रुपये इतकी या युबारी मेलनची किंमत आहे. आता सांगा, आपल्याला आंबा इतका महाग वाटतो, मग या फळासमोर तर आंबाही गरीब ठरतो नाही का? युबारी शहरात या फळाची शेती होते म्हणूनच याचं नाव युबारी मेलन असं पडलं आहे.

डिहायड्रेशन, उच्च रक्तदाब, इन्फ्लेमेशन यावर हे फळ औषधी असल्याचे म्हटले आहे. तसेच इम्युनिटी बुस्टर म्हणूनही हे फळ कामी येतं. यातील ऍंटिऑक्सिडेंटमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, असंही म्हटलं जातं. वैशिष्ट्य असं की हे फळ फक्त जापानमध्ये उगवलं जातं. त्यामुळे जापानच्या या फळाला खूप किंमत प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर सहजासहजी हे फळ मिळत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.