Alibaug Beach : अलिबाग बीचवर सुट्टी घालवण्याचा विचार करताय? मग या स्थळांना नक्कीच भेट द्या

64
Alibaug Beach : अलिबाग बीचवर सुट्टी घालवण्याचा विचार करताय? मग या स्थळांना नक्कीच भेट द्या

सुट्टीमध्ये पिकनिकला जायचा विचार करताय? पण कुठे जायचं ते कळत नाही? डोन्ट व्हरी! आम्ही तुम्हाला अशा एका पिकनिक स्पॉटची माहिती सांगणार आहोत, जो मुंबईपासून अगदी जवळ आहे. या पिकनिक स्पॉटवर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबतही जाऊ शकता. (Alibaug Beach)

त्या पिकनिक स्पॉटचं नाव आहे अलिबाग. होय, आज आम्ही तुम्हाला अलिबागमधल्या काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती सांगणार आहोत. अलिबाग बीच म्हणजेच समुद्रकिनारा हा प्रसिद्ध आहेच. या समुद्रकिनार्‍यावर मनसोक्त हिंडता येतं, खेळता येतं, धम्माल करता येते. तसेच अलिबागमध्ये वेगवेगळी ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही गेलंच पाहिजे. (Alibaug Beach)

या पर्यटन स्थळांवर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत सहलीला जाऊन खूप चांगला वेळ घालवू शकता. तसेच इथल्या सुंदर निसर्गरम्य वातावरणातल्या सुंदर आठवणी आपल्यासोबत घरी नेऊ शकता. चला तर मग पाहुयात अलिबागमध्ये फिरण्यासाठी असलेली सुंदर ठिकाणे : (Alibaug Beach)

१. ब्रह्म कुंड

ब्रह्म कुंड हे अलिबागमधल्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे कुंड १६१२ साली बांधण्यात आले होते. या कुंडाच्या आतल्या बाजूने चारही बाजूंना पायऱ्या बांधण्यात आला आहेत. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार या कुंडामध्ये ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाला स्नान घातले होते. (Alibaug Beach)

हे ठिकाण अलिबागपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. अलिबागमधल्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करून तुम्ही इथे पोहोचू शकता.

(हेही वाचा – Naresh Mhaske: उबाठा गटाचे २ खासदार शिंदेंकडे येणार, नरेश म्हस्के पत्रकार परिषदेत म्हणाले…)

२. कुणकेश्वर जंगल

कुणकेश्वर जंगलाचे तापमान कायम थंड असते. या जंगलात कितीतरी प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती तसेच प्राणी पाहायला मिळतात.

इथल्या मापगाव नावाच्या डोंगराळ भागामध्ये बाराशे फुटांच्या उंचीच्या एका डोंगरावर खूप जुनं शिवमंदिर आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी सातशे ते सातशे पन्नास पायऱ्या चढून जावं लागतं.

इथे आसपासच्या जंगलात पर्यटक फिरायला आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला येतात. पण सूर्यास्तानंतर जंगलात फिरायला परवानगी नाही. (Alibaug Beach)

३. मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड इथला जंजिरा किल्ला हा अलिबागपासून चोपन्न किलोमीटर अंतरावर आहे. बावीस एकर एवढ्या मोठ्या जमिनीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. या किल्ल्याचं बांधकाम हे आपल्या भारतीय कारागिरांच्या कुशलतेचा उत्कृष्ट नमुना आहे.

मुरुड येथे पोहोचण्यासाठी मुंबई, पुणे आणि अलिबागहूनही रस्त्याने प्रवास करून जाता येते. (Alibaug Beach)

४. कोलाबा किल्ला

अलिबागच्या समुद्र किनाऱ्यापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेला कोलाबा किल्ला हा पर्यटकांना आकर्षित करतो.

या किल्ल्याच्या तटबंदीची सरासरी उंची पंचवीस फूट इतकी आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. एक दार समुद्रकिनारी आहे तर दुसरं अलिबागकडे आहे. जर तुम्ही पावसाळ्यात या किल्ल्यावर फिरायला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला ओहोटीच्या वेळी जावं लागेल. कारण पावसाळ्यात भरतीच्या वेळी इथे फिरणं शक्य नाही. या किल्ल्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे किल्ल्यामधलं सिद्धिविनायक मंदिर होय. (Alibaug Beach)

५. अलिबाग समुद्रकिनारा

तुम्हाला जर समुद्रकिनारी फिरायला आवडत असेल आणि तुम्ही सहलीला जायचा विचार करत असाल तर अलिबाग समुद्रकिनारा हे अलिबागमधल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या समुद्रकिनाऱ्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कुलाबा किल्ल्यावर फिरण्याचाही आनंद घेऊ शकता.

इथे असलेले ४०० वर्षे जुने गणेश मंदिरही तुम्हाला पाहता येईल. तुम्ही या समुद्रकिनारी सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होऊ शकता. या समुद्रकिनाऱ्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ताजी हवा आणि थंड वाळू असलेला समुद्रकिनारा होय. नारळपाणी किंवा वडापावचा आनंद घेत तुम्ही सूर्यास्त पाहू शकता. इथे बीच रिसॉर्ट्सही आहेत. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला मिळतील.

याव्यतिरिक्त अलिबाग येथे फिरण्यासाठी कितीतरी ठिकाणं आहेत, जिथून तुम्ही आपल्या कुटुंबासोबत चांगल्या आठवणी घेऊन येऊ शकता. (Alibaug Beach)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.