Adani Energy Solutions Share Price : अदानी समुहातील या कंपनीने ३ महिन्यांत कमावले ७१४ कोटी रुपये

Adani Energy Solutions Share Price : कंपनीचं शेअर बाजारातील भांग भांडवल १.१६ लाख कोटींचं आहे.

20
Adani Energy Solutions Share Price : अदानी समुहातील या कंपनीने ३ महिन्यांत कमावले ७१४ कोटी रुपये
  • ऋजुता लुकतुके

गौतम अदानी यांची अमेरिकन कोर्टात सुनावणी सुरू असतानाच मागच्या काही दिवसांत अदानी समुहातील शेअर मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. रेल्वे मार्ग आणि बंदरांचा विकास हा समुहाचा मूलभूत उद्योग आहे. पण, त्याचबरोबर समुहाच्या ताफ्यातील आणखी दोन महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित. अदानी ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स आणि अदानी एनर्जी लिमिटेड. यातील अदानी एनर्जी सोल्युशन्स ही कंपनी समुहाने वीज पुरवठा कंपनी म्हणून विकसित केली आहे. (Adani Energy Solutions Share Price)

आणि कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना निराश केलेलं नाही. आताही चौथ्या तिमाहीतील कामगिरीनंतर कंपनीच्या शेअरवर लोकांचं लक्ष आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ३ महिन्यांत तब्बल ७१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ८९ टक्क्यांनी वाढला आहे. शुक्रवारी एकूणच भारतीय बाजारांनी धिमी चाल पकडलेली असल्यामुळे हा शेअरही खाली आला आणि ५.४६ टक्क्यांच्या घसरणीसह तो ९०९.२० अंशांवर बंद झाला. पण, एरवी महिनाभरात शेअरमध्ये तब्बल १०६ अंश किंवा ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Adani Energy Solutions Share Price)

(हेही वाचा – Tanush Kotian : मुंबईकर तनुष कोटियन पंजाब किंग्जचा नेट्स गोलंदाज)

New Project 2025 04 26T190808.041

शुक्रवारी जरी हा शेअर खाली आला असला तरी एकंदरीत या शेअरमध्ये वातावरण हे सकारात्मक आहे. त्यातच कंपनी टोटल एनर्जी कंपनीबरोबर ५० टक्के भागिदारीत नवीन सहकार्य करार करत आहे. मागच्या तिमाहीत कंपनीला मिळालेल्या एकाच मोठ्या ऑर्डरमुळे त्यांना एवढा मोठा नफा झाला आहे. कंपनीचं भाग भांडवल १.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. (Adani Energy Solutions Share Price)

गुजरातमधील खावडा भागात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात टोटल एनर्जी कंपनीला भागिदारी हवी आहे. त्या प्रकल्पावरच दोन्ही कंपन्या एकत्र काम करणार आहेत. हा सौरऊर्जा प्रकल्प १,१५० मेगावॅट क्षमतेचा आहे. तर अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि टोटल एनर्जी यांचा सहकार्य करार हा एकूण ४४० दशलक्ष अमेरिकन डॉलर मूल्याचा आहे. (Adani Energy Solutions Share Price)

(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट गुंतवणूकदारांना शेअरमधील खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.