Aarti Industries Share Price : रिलायन्स सेक्युरिटीजने आरती इंडस्ट्रीजवर काय सल्ला दिला?

Aarti Industries Share Price : आरती इंडस्ट्रीजने या तिमाहीत चांगले निकाल जाहीर केले आहेत.

33
Aarti Industries Share Price : रिलायन्स सेक्युरिटीजने आरती इंडस्ट्रीजवर काय सल्ला दिला?
  • ऋजुता लुकतुके

एकीकडे भारत – पाक दरम्यानच्या तणावामुळे शेअर बाजार खाली येत असताना आरती इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर तेजी दिसून येत आहे. कंपनीने तसेच तगडे निकाल जाहीर केले आहेत. कर भरल्यानंतरचा नफा तब्बल दुप्पट झाला आहे. गेल्यावर्षीच्या ४६ कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा आता ९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूलही २,११४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीची काही केमिकल्स जोरदार विकली जात आहेत. पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला प्रोत्साहन म्हणून कंपनीने ऊर्जा क्षेत्रात दोन नवीन करार केले आहेत. (Aarti Industries Share Price)

या कामगिरीचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही जाणवत असून या आठवडाभरात शेअर ५ टक्क्यांनी वाढला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना यात २.४५ अंशांच्या वाढीसह शेअर ४५१ अंशांवर बंद झाला आहे. (Aarti Industries Share Price)

(हेही वाचा – पाकिस्तानने भारतीय महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा खोटा; पीआयबीने Fact Check द्वारे केला पर्दाफाश )

New Project 2025 05 10T191449.811

कंपनीची पुढील वाटचालही धोरणात्मक आहे. येत्या काही महिन्यात कंपनी झोन ४ मधील प्रकल्प सुरू करणार आहे. यातून कंपनीची बहुउद्देशीय उत्पादन क्षमता वाढणार आहे. चांगल्या तिमाही निकालांच्या जोरावर रिलायन्स सेक्युरीटीजने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. ८ ते १० महिन्यांत या शेअरमध्ये १४-२६ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असं संशोधन संस्थेचा अंदाज आहे. (Aarti Industries Share Price)

हा शेअर तांत्रिकदृष्ट्या वाढीसाठी सक्षम आहे आणि ३८५ ते ३९३ या किमतीला तो खरेदी केला तर आगामी वर्षभराच्या आत तो ४८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२४ मध्ये हा शेअर सातत्याने पडला आहे. आणि त्यानंतर शेअरमध्ये स्थिरताही आलेली दिसते. याचाच अर्थ हा शेअर आता तेजीकडे वाटचाल करू शकतो, असं रिलायन्स सिक्युरीटीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. (Aarti Industries Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.