Yashoda Ganesh Savarkar : तात्यारावांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान असणाऱ्या येसूवहिनींचे कृतज्ञ स्मरण!

येसूवहिनींनी देशासाठी प्रचंड हाल सोसले, दारिद्र्याशी झगडत आपल्या कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर जप्ती येऊनही न डगमगता, समाजाच्या निंदानालस्तीला धैर्याने तोंड देत सावरकर बंधुंचा क्रांतिलढा अविरतपणे चालू ठेवला, तो घराघरांत पोहोचवला.

229
Yashoda Ganesh Savarkar: तात्यारावांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान असणाऱ्या येसूवहिनींचे कृतज्ञ स्मरण!
Yashoda Ganesh Savarkar: तात्यारावांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान असणाऱ्या येसूवहिनींचे कृतज्ञ स्मरण!

स्वातंत्र्यसंग्रामातील धैर्यमूर्ती, क्रांतिज्योती आदरणीय सौ. यशोदा गणेश सावरकर तथा येसूवहिनी सावरकर यांच्या पावन स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! (Yashoda Ganesh Savarkar)

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकर कुटुंबाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव), (Swatantryaveer Savarkar) गणेश दामोदर सावरकर (बाबाराव) आणि डॉ. नारायण दामोदर सावरकर (बाळ) या त्रिवर्ग सावरकर बंधुंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचं मोल दिलं. हे तीनही क्रांतिसूर्य तेजाने तळपत असले, तरी या तिघांच्याही मागे अगदी प्रथमपासून एक वीरांगना कायम खंबीरपणे उभी होती आणि ती म्हणजे सौ. सरस्वतीबाई ऊर्फ यशोदा गणेश सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची लाडकी परमआदरणीय येसूवहिनी ! (Yashoda Ganesh Savarkar)

येसूवहिनींनी देशासाठी प्रचंड हाल सोसले, दारिद्र्याशी झगडत आपल्या कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर जप्ती येऊनही न डगमगता, समाजाच्या निंदानालस्तीला धैर्याने तोंड देत सावरकर बंधुंचा क्रांतिलढा अविरतपणे चालू ठेवला, तो घराघरांत पोहोचवला. तो काळ स्त्रियांसाठी पुढारलेला नसूनही आपल्या परीने स्त्रियांमध्ये स्वातंत्र्याची, स्वदेशीची आस जागवली. क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला आणि अखेरीस अंदमानात जन्मठेप भोगत असलेल्या आपल्या पतीच्या, बाबारावांच्या दर्शनाचा ध्यास घेत इहलोकीचा निरोप घेतला.  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आयुष्यभर जळत राहून सर्वस्वाचा होम करणाऱ्या खुद्द तात्यारावांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान असणाऱ्या या गृहिणीचे, वीरांगनेचे कृतज्ञ स्मरण!  (‘तू धैर्याची अससी मूर्ति’ या पुस्तकातला संपादित भाग! )

“तू धैर्याची असशी मूर्ति, माझे वहिनी माझी स्फूर्ती”- स्वातंत्र्यवीर सावरकर.

इंग्रज सरकारकडून अंदमान भेटीची परवानगी (Yashoda Ganesh Savarkar)

१९०९ साली बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा होऊन त्यांचीही रवानगी अंदमानात झाली. इंग्रज सरकारने नाशिक शहरातून क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून त्यांची धिंड काढली. त्यामुळे त्या वेळेस येसू वहिनींची आणि बाबारावांची साधी दृष्टिभेटही होऊ शकली नाही. या माऊलीने त्यानंतर घरावर इंग्रजांनी आणलेल्या अनेक जप्त्यांना अतिशय धीराने तोंड दिले. क्रांतीकार्याला संपूर्ण मदत केली. “आत्मनिष्ठ युवती संघ” नावाची संघटना त्या चालवीत आणि त्याद्वारे देशसेवेचे काम करीत. सावरकर भावंडांची आई लहानपणीच वारली. येसूवहिनींच्या रूपाने या सर्वांना आई, सखी, वहिनी सर्व काही मिळाले ! आपल्या दीरांवर त्यांनी अपरंपार माया केली. त्यांच्या शिक्षणासाठी प्रसंगी स्वतःचे दागिनेही विकले. बाबारावांच्या भेटीचा ध्यास आणि आस मनात तशीच ठेवून हे त्यागमय जीवन ५ फेब्रुवारी १९१९ रोजी अनंतात विलीन झाले. येसू वहिनींच्या निधनानंतर केवळ तिसर्‍याच दिवशी इंग्रज सरकारकडून अंदमान भेटीची परवानगी आली. यापेक्षा दैवदुर्विलास तो काय!

– विनता जोशी

(हेही वाचा  –  Zee Sony Merger Deal Fallout : झी भारतीय न्यायाधिकारणाकडे दाद मागणार)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.