Radha Krishna Happy Holi : होळी हा सण राधा-कृष्णाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक!

राधा-कृष्ण हे असं दैवत आहे, ज्यांच्या मूर्तीकडे पाहिलं तरी आपलं मन प्रसन्न होतं. राधा-कृष्णाचा फोटो घरात लावला तर प्रेम-समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात.

202
Radha Krishna Happy Holi : होळी हा सण राधा-कृष्णाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक!

मित्रांनो, आपण होळी हा सण का साजरा करतो. खरंतर जेव्हा आपण रंग खेळतो त्यास धुळवड किंवा धुलिवंदन म्हणतात. मात्र ’होळी खेळणे’ हा जनसामान्यात रुजलेला शब्द आहे. गरबा आणि होळी म्हटलं तर आपल्यासमोर उभं राहतं प्रेमाचं प्रतीक असलेलं दैवत; राधा-कृष्ण. (Radha Krishna Happy Holi).

राधा-कृष्ण हे असं दैवत आहे, ज्यांच्या मूर्तीकडे पाहिलं तरी आपलं मन प्रसन्न होतं. राधा-कृष्णाचा फोटो घरात लावला तर प्रेम-समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. म्हणून होळी हा आनंदाचा सण सुद्धा राधा-कृष्णाच्या (Radha Krishna Happy Holi) प्रेमाचं प्रतीक ठरला. मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुल, नंदगांव आणि बरसाना असा ठिकाणी होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ही ठिकाणे कृष्णाशी संबंधित आहेत. (Radha Krishna Happy Holi)

वृंदावनात फुलवाली होळी आणि बरसाना मधील पारंपारिक होळी उत्सव लठमार होळी यांचा समावेश आहे. या सणाला रंगवाली होळी व धुळंदी देखील म्हणतात. होळी खेळण्याबाबत राधा-कृष्णाची एक आख्यायिका देखील आहे. चला तर जाणून घेऊया, होळी आणि राधा-कृष्णाचा (Radha Krishna Happy Holi) काय संबंध आहे. (Radha Krishna Happy Holi)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : माधव मधील “ध” गळाल्याने महायुतीला फटका)

राधा-कृष्ण आणि होळी :

होळी हा आनंदाचा, वाईटावर सज्जनांनी मात करण्याचा सण आहे. राधा-कृष्ण यांच्या पवित्र प्रेमाचा (Radha Krishna Happy Holi) हा सण आहे. वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीदरम्यान हा खरंतर शेतकर्‍यांसाठी कापणी उत्सव असतो. हिंदू पौराणिक कथांनुसार राधा अत्यंत गोरी होती आणि भगवान श्रीकृष्ण बिचारा आपला सावळा.. आपण सावळे आणि राधा गोरी म्हणून बालकृष्णाला प्रश्न पडला की त्यांची मैत्री होईल की नाही? गोर्‍या राधाला सावळा कृष्ण आवडेल की नाही? (Radha Krishna Happy Holi)

म्हणून कृष्ण यशोदा मैयाकडे आला आणि त्याने आपली समस्या सांगितली. यशोदाला कृष्णाच्या बोलण्यावर हसूच आले. मात्र तिने हसू दाबत म्हटले, ’नटखट कृष्णा, तू एक काम कर राधाच्या चेहर्‍याला एक वेगळाच रंग लाव. म्हणजे तुमच्या कोणताच अंतर उरणार नाही.’ बालकृष्णाला यशोदा मैयाचे हे बोल पटले. शेवटी कृष्णाचीच लीला होती ती… मग त्याने राधाच्या चेहर्‍याला डाग लावण्यासाठी गुलालाचा वापर केला. आता राधा गोरी राहिली नाही तर गुलालाच्या रंगात रंगून गेली आणि अशा प्रकारे राधा-कृष्णामुळे होळी हा सण साजरा होऊ लागला. (Radha Krishna Happy Holi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.