Operation Sindoor : पहलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist attack) भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) सीमेवर गोळीबार करणे सुरु केले आहे. या हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर ४३ जण जखमी झाले. पूंछ आणि तंगधार येथे हा गोळीबार केला. पाकिस्तान पूंछ आणि आसपासच्या भागात नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि गोळीबार करत आहे. (Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community