National Security Day: सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी…

अलिकडच्या काही वर्षांत लष्करात अनेक आधुनिक बदल झाले आहेत. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची खरेदी आणि स्वदेशी तेजस लढाऊ विमानांचा समावेश, हवाई संरक्षण आणि लढाऊ क्षमता वाढवणाऱ्या शस्त्रास्त्रांचीही भर यामध्ये पडली आहे. भारताची ही उल्लेखनीय कामगिरी आहे.

375
National Security Day: सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी...
National Security Day: सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी...
  • संजोग टिळक 

राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या (National Security Day) दृष्टिने विविध विकसित घटकांचा आढावा घेतला जातो. यावर्षी अर्थात २०२४ मध्ये देशातील सुरक्षा पद्धतींच्या दिशेने जागतिक बदलाशी सुसंगत पर्यावरण, सामाज, प्रशासन इत्यादी विषयांचा एकत्रित विचार करून त्यामध्ये होणारे कायमस्वरुपी बदल या विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२४’ यानिमित्त देशातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आणि त्याबाबत काळानुरुप होणारे आवश्यक बदल याबाबत घेतलेला हा मागोवा…

देशाच्या सुरक्षेअंतर्गत सध्या सायबर धोके, दहशतवाद, बंडखोरी याअंतर्गतही सुरक्षा महत्त्वाची आहे. या दिवशी सुरक्षिततेसंदर्भातील या मुद्द्यांबाबतही जनजागृती केली जाणार आहे. या मुद्यांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्यामुळे देशातील नागरिकांना सायबर क्राईम, दहशतवादाशी संबंधित सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक असलेल्या उपायांबद्दल सांगितले जाते.

संरक्षणविषयक आधुनिकीकरण
अलिकडच्या काही वर्षांत लष्करात अनेक आधुनिक बदल झाले आहेत. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची खरेदी आणि स्वदेशी तेजस लढाऊ विमानांचा समावेश, हवाई संरक्षण आणि लढाऊ क्षमता वाढवणाऱ्या शस्त्रास्त्रांचीही भर यामध्ये पडली आहे. भारताची ही उल्लेखनीय कामगिरी आहे, शिवाय प्रकल्प ७५ आणि प्रकल्प १७-ए अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्या आणि पृष्ठभागावरील युद्धनौकांवर नौदलाचे लक्ष केंद्रित करणे हा सागरी सामर्थ्याच्या दिशेने झालेला मजबूत संरक्षणात्मक बदल आहे. लष्करावर पाळत ठेवणारे ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली यांचे एकत्रीकरण यामुळे युद्धक्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे, तसेच वाखाणण्याजोगी बाब ही की, भारत परराष्ट्र धोरण राबवताना त्यामध्ये जागतिक घटकांशी धोरणात्मक संबंध अधिक दृढ कसे होतील याचाही विचार करत आहे, हे लक्षात येते. यासाठी कॉमकासा आणि बी. ई. सी. ए. सारख्या पायाभूत करारांवर स्वाक्षऱ्या करून भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी वाढवल्याने माहितीचीही देवाणघेवाण वाढते.

अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी प्रयत्न
दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणांचे एकत्रीकरण करणाऱ्या भारताचे अंतर्गत सुरक्षा धोरण अधिकाधिक अत्याधुनिक होत चालले आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सायबर आणि प्रगत गुप्तचर साधनांचा वापर वाढत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सीमापार दहशतवादावर कारवाई करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकास
आर्थिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यातील संबंध भारताच्या आर्थिक धोरणांमधून स्पष्ट होतो. ‘आत्मनिर्भर भारत’सारख्या उपक्रमांचे उद्दीष्ट सर्व क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, आर्थिक असुरक्षितता कमी करणे हे आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) सारख्या नवीन ऊर्जा प्रकल्पांमधील गुंतवणूक शाश्वत विकास उद्दिष्टांचे पालन करताना ऊर्जा सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते. डिजिटल इंडियासारख्या प्रकल्पांनी अधोरेखित केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे आर्थिक विकास साधण्यावर भर दिला जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे महत्त्व
१९७२ मध्ये तामिळनाडूमधील खत कारखान्यात झालेल्या एका दुःखद अपघातात अनेक जीव गमावले गेले. तेव्हापासून भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची स्थापना करण्यात आली. हा दिवस तेव्हापासून सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, व्यक्ती आणि संस्थांना सुरक्षा-सुरक्षितता प्रदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा होऊ लागला. सुरक्षेला चालना देण्याबरोबरच देशात सुरक्षितता टिकून राहणेही आवश्यक आहे. यावरही या दिवसाच्या अनुषंगाने भर दिला जातो. यानिमित्त प्रशासनामार्फतही जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन होत असते. दरवर्षी नॅशनल सेफ्टी काऊंन्सिल (National Security Council)कडून एका थीमबाबत निर्णय घेतले जातात. लोकांना भेडसावणाऱ्या सामान्य समस्यांचा याअंतर्गत विचार होतो.

राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त आतापर्यंत राबवण्यात आलेल्या थीम
राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२३ थीम : आमचे ध्येय – शून्य हानी
राष्ट्रीय सुरक्षा दिन २०२२ थीम : तरुण मनांचे पालनपोषण करा – सुरक्षा संस्कृती विकसित करा
राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२१ थीम : रस्त्यावरील सुरक्षा
राष्ट्रीय सुरक्षा दिन २०२० थीम : राष्ट्र निर्माण करण्यासाठी सुरक्षा संस्कृती जोपासा आणि टिकवून ठेवा

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.