luxury Resorts In Rishikesh: ऋषिकेशमधील सर्वोत्तम रिसॉर्टस् कोणते? जाणून घ्या…

हरिद्वारपासून २५ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण साधकांसाठी, यात्रेकरूंसाठी हे ठिकाण प्रसिद्ध असून शिवाय ते अध्यात्माचे प्रतीक समजले जाते.

126
luxury Resorts In Rishikesh: ऋषिकेशमधील सर्वोत्तम रिसॉर्टस् कोणते? जाणून घ्या...
luxury Resorts In Rishikesh: ऋषिकेशमधील सर्वोत्तम रिसॉर्टस् कोणते? जाणून घ्या...

हिमालयाच्या कुशीत आणि पवित्र गंगा नदीच्या काठी वसलेले (luxury Resorts In Rishikesh) ऋषिकेष. भारताची योग राजधानी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शांत शहर…योग साधना तसेच इतर पंथातील साधकांना साधना करण्यासाठी उत्तम ठिकाण, विविध पसंती आणि बजेटनुसार येथे निवासाचे पर्याय उपलब्ध आहेत. सुंदर बाग, आरामदायी खोल्या, बजेटफ्रेंडली गेस्ट हाऊस, आलिशान तंबू, कॉटेज निवास व्यवस्था…असे अनेकविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.

ऋषिकेशमध्ये पवित्र गंगा आहे. आध्यात्मिक तीर्थयात्रा आणि आरोग्यासाठी पर्यटक येथे येतात. दुहेरी पूल – राम आणि लक्ष्मण झुला – हे स्थापत्यशास्त्रातील यश आहे; कारण हे पूल गंगेवर 750 फूट उंचावर आहेत. ऋषिकेशमधील विविध घाटांवर पवित्र गंगेची पूजा केली जाते. परमार्थ निकेतन येथे गंगा आरती आणि त्रिवेणी घाट हा आनंददायी अनुभव येथे घेता येतो.

हरिद्वारपासून २५ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण साधकांसाठी, यात्रेकरूंसाठी हे ठिकाण प्रसिद्ध असून शिवाय ते अध्यात्माचे प्रतीक समजले जाते. येथील हॉटेल आणि रिसॉर्टस् प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र केंद्रे आहेत. येथे गेल्यावर आंतरिक शांततेचा अनुभव नक्कीच येतो. नयनरम्य गंगा नदी आणि भव्य हिमालयाच्या मध्यभागी ऋषिकेशमधील हॉटेल्स आणि रिसॉर्ट आश्रम वसलेली आहेत. हे येथील मुख्य आकर्षण आहे.

जस्टा ने लक्ज़री बुटीक जस्टा रासा, ऋषिकेश - होटलियर इंडिया का अनावरण किया

गुलाबी गंगा, ऋषिकेश
हे 5-स्टार लक्झरी हॉटेल आहे. येथे १७ सुस्थितीतील व्हिला असून येथे कुटुंबासह गेल्यास आरामदायी निवास व्यवस्था आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे तापमान नियंत्रित इन्फिनिटी स्विमिंग पूल आहेत. आजूबाजूच्या परिसरात चिडिया घर, जेवणाची उत्तम व्यवस्था, रोस्टेड ब्र रोझेट आहेत. येथील प्रत्येक खोल्यांना बाल्कनी आहे. जेथून तुम्हाला येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो.

The Westin Resort & Spa Himalayas, Rishīkesh – Updated 2024 Prices

वेस्टिन रिसॉर्ट आणि स्पा हिमालय
प्रिमियम, डिलक्स, वेस्टिन फॅमिली, क्लासिक, एक्झिक्युटिव्ह सूट आणि गार्डन म्हणून खोल्या आणि स्वीट्सचे वर्गीकरण केले आहे. खाद्यपदार्थांसाठी, अकासा, दिवसभर जेवणाचे रेस्टॉरंट, टोया, आशियाई पाककृतींची सुविधा येथे उपलब्ध आहे.

Aloha on the Ganges, Resorts in Uttarakhand

अलोहा ऑन दी गंगा, ऋषिकेश
ऋषिकेशमधील अलोहा ऑन दी गंगा हे गंगा नदीवरील एका उत्कृष्ट स्थानावर आणि लक्ष्मण झुलाजवळ वसलेले आहे. समोरच नदी आणि बागबगिचे असलेल्या विविध खोल्या आणि अपार्टमेंटसह सुपिरियर व डिलक्स रुमसह अधिक काळ वास्तव्य करण्यासाठी कुटुंब व पाहुण्यांसाठी हे ठिकाण अतिशय समर्पक आहे. अलोहा ऑन दी गंगामधील पाहुण्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट, लॅटिट्युड आणि पशियो, अल-फ्रेस्को रेस्टॉरंट सेवेसाठी हजर आहेत. या हॉटेलमध्येच बेकरीही आहे. येथील चविष्ट बेक्स आणि बाईट्स खाण्याचा मोह आवरता येत नाही. स्पासारख्या मनोरंजक सुविधा, इन्फिनिटी स्विमिंग पूल आणि योग सत्रे पाहुण्यांना अलोहा ऑन दी गंगा हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.

Ganga Lahari, Resorts in Uttarakhand

गंगा लहिरी, हरिद्वार
हरिद्वारमधील हे एक सर्वोत्कृष्ट हॉटेल आहे. गंगा नदीच्या गौ घाटाच्या एका सुरेख स्थानावर हे वसलेले आहे. हर की पौडी येथून केवळ चालत अंतरावर आहे. अत्याधुनिक सुखसुविधा असलेल्या प्रशस्त आणि आरामदायक खोल्यांसोबत, या हॉटेलात रिव्हर साईड हे केवळ शाकाहारी विविध खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट आहे. जिथून गंगेच्या पवित्र आणि सुंदर जलाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथे राहणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला समाधान मिळण्यासाठी मंदिरातील पवित्र स्थानांना भेट द्यावी लागेल आणि हे गंगा लहिरीच्या कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे तसेच येथे हॉटेल आयोजित करत असलेल्या योग आणि चिंतन सत्रांसोबत भजने आणि कीर्तनामुळे मनाला अद्भुत शांती मिळते.

ऋषिकेशला कसे जायचे
हवाई मार्गे: जॉली ग्रँट विमानतळ, डेहराडून, हे ऋषिकेशचे सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे. रस्त्याने: ऋषिकेश प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांशी चांगले जोडलेले आहे आणि देशाच्या सर्व भागांतून सहज पोहोचता येते. रेल्वेने: ऋषिकेशमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे जे हरिद्वार व्यतिरिक्त प्रमुख भारतीय शहरांशी जोडलेले नाही. म्हणून, जवळचे प्रमुख स्थानक हरिद्वार आहे, जे इतर शहरांशी चांगले जोडलेले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.