K. Subramaniam: तामिळ चित्रपट उद्योग निर्माते आणि पटकथाकार !

    १९३८मध्ये स्त्रियांच्या हक्कावर आधारित त्यांनी सेवासदनम नावाचा चित्रपट बनवला तसेच अस्पृश्यतेवर टीका करणारा संत चित्रपट भक्त चेथा आणि युद्धपट मानसंरक्षणम बनवला.

    57
    K. Subramaniam: तामिळ चित्रपट उद्योग निर्माते आणि पटकथाकार !

    कृष्णसामी सुब्रमण्यम (K Subramaniam) हे १९३० आणि १९४०चे भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म २० एप्रिल १९०४ रोजी मद्रास येथे झाला. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. तामिळ चित्रपट उद्योग निर्माण करण्यात कृष्णासामी सुब्रमण्यम यांचा सहभाग होता. पी.के. राजा सँडो यांच्या पेयुम पेनमसारख्या मूक चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी पटकथाकार आणि निर्माता म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.

    मीनाक्षी सिनेटनची सुरुवात त्यांनी अलगप्पा चेट्टियार यांच्यासोबत केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिल्या चित्रपटाचे नाव पावलाक्कोडी असे होते, ज्यामध्ये तामिळ चित्रपट स्टार एम.के. त्यागराजा भागवथर यांनी पदार्पण केले. त्या काळी जातीजातींमध्ये भेद केला जायचा. या व्यवस्थेवर टीका राजकीयदृष्ट्या टीका करणारा बालयोगिनी हा चित्रपट त्यांनी तयार केला.

    (हेही वाचा – Pune Terrorist Case: पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात एटीएसची कारवाई, १५ दहशतवादी ताब्यात)

    १९३८मध्ये स्त्रियांच्या हक्कावर आधारित त्यांनी सेवासदनम नावाचा चित्रपट बनवला तसेच अस्पृश्यतेवर टीका करणारा संत चित्रपट भक्त चेथा आणि युद्धपट मानसंरक्षणम बनवला. त्याग भूमी हा त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट होता. त्याग भूमी ही कल्की कृष्णमूर्ती यांची कादंबरी होती, ज्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती.

    १९५२ मध्ये त्यांनी नादिगर संगम या चित्रपट संस्थेची स्थापना केली. नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम त्यांची मुलगी. प्रल्हाद या मल्याळम चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.