Eknath Solkar: आधी स्कोअर बोर्ड बदलायचे, नंतर झाले प्रसिद्ध फलंदाज !

त्यांनी घेतलेल्या झेलांमुळे भारताला १९७१ मध्ये द ओव्हलमध्ये इंग्लंड विरुद्ध विजय मिळवता आला.

181
Eknath Solkar: आधी स्कोअर बोर्ड बदलायचे, नंतर झाले प्रसिद्ध फलंदाज !

एकनाथ धोंडू सोलकर (Eknath Solkar) यांचा जन्म १८ मार्च १९४८ रोजी मुंबईत झाला. एक एक अष्टपैलू क्रिकेटपटू होते. त्यांनी भारतासाठी २७ कसोटी सामने आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांची खासियत म्हणजे त्यांच्या काळातील ते महान क्षेत्ररक्षक होते. कसोटी सामन्यांमध्ये अनेक झेल घेऊन त्यांनी दिग्गज खेळाडूंना पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे.

सोलकर यांचे वडील मुंबईतील हिंदू जिमखाना येथे हेड ग्राउंड्समन होते. त्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे स्कोअरबोर्ड एकनाथ सोलकर बदलायचे. त्यांचा धाकटा भाऊ अनंत सोलकर हादेखील प्रथम श्रेणी स्तरावर क्रिकेट खेळला आहे. सोलकर यांची कारकीर्द अगदी शालेय जीवनापासून सुरू झाली. शालेय स्तरावर क्रिकेट खेळताना त्यांनी १९६४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला आणि १९६५-६६ मध्ये लंडन स्कूल्सविरुद्ध भारतीय शाळा संघाचे नेतृत्व केले. या संघात भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथदेखील होते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पुणे जिल्ह्यात २ टप्प्यांत मतदान; मावळ, शिरूरसाठी १८ आणि बारामतीसाठी १२ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया )

…फक्त बॉल दिसायचा
मग पुढे १९६९ आणि १९७० मध्ये ससेक्स सेकंड इलेव्हनसाठी ते खेळले आणि पहिल्या इलेव्हनसाठी खेळण्यास पात्र ठरले. सोलकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कसोटी सामन्यांत शतक झळकावले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वेगात व संथ गतीनेही गोलंदाजी करू शकत होते. त्यांनी घेतलेल्या झेलांमुळे भारताला १९७१ मध्ये द ओव्हलमध्ये इंग्लंड विरुद्ध विजय मिळवता आला. मैदानामध्ये फलंदाजी करताना त्यांना फक्त बॉल दिसायचा. त्यामुळेच ते यशस्वी फलंदाज होऊ शकले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.