Wajahat Khan : शर्मिष्ठा पानोलीच्या (Sharmistha Panoli case) विरोधात तक्रार करणाऱ्या वजाहत खान (Wajahat Khan) याच्या विरोधात हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याने हिंदू देवी देवतांविरोधात केलेल्या अश्लील पोस्टमुळे त्याच्या अटकेची मागणी देशभर होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दादर मुंबई येथील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात (Shivaji Park Police Station) तक्रार दाखल केली आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केली आहे. (Wajahat Khan)
Join Our WhatsApp Community