Cinematographer Santosh Sivan: भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ‘हे’ आहेत सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर !

संतोष यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ५६ चित्रपट आणि ५० माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंटरी फिल्म तयार केले आहेत.

165
Cinematographer Santosh Sivan: भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, 'हे' आहेत सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर !
Cinematographer Santosh Sivan: भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, 'हे' आहेत सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर !
मल्याळम आणि हिंदी सिनेसृष्टीत संतोष सिवन यांना सगळेच ओळखतात. त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६४ साली झाला. ते एक भारतीय सिनेमॅटोग्राफर, फिल्म डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ऍक्टर आहेत. ते मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.  (Cinematographer Santosh Sivan)
संतोष यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ५६ चित्रपट आणि ५० माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंटरी फिल्म तयार केले आहेत. ते भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जातात. दिग्दर्शक म्हणून, संतोष यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार १९८८ साली स्टोरी ऑफ टिब्लू या चित्रपटसाठी मिळाला. त्यांच्या हॅलो नावाच्या चित्रपटला ३२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
संतोष हे इंडियन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्सचे संस्थापक सदस्य आहेत. तसेच ते भारतातील सिनेमॅटोग्राफीचे सर्वाधिक सन्मानित दिग्दर्शकही आहेत. त्यांना बारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार, चार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि तीन तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफरचे सदस्यत्व मिळवणारे सामील होणारे संतोष हे आशिया-पॅसिफिक प्रदेशातले पहिले सिनेमॅटोग्राफर ठरले. सिनेमॅटोग्राफर म्हणून, त्यांनी सर्वोत्कृष्ट फिल्म सिनेमॅटोग्राफीसाठी चार ते पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेले आहेत. २०१४ सालापर्यंत, त्यांना ११ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०१४ साली संतोष सिवन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संतोष सिवन यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे:
■केरळ राज्य चित्रपट पुरस्कार
●1992 – अहम – सर्वोत्कृष्ट छायांकन
●1994 – पवित्रम – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●1996 – कालापानी – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●2005 – आनंदभद्रम – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
■तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
●1992 – रोजा – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●1996 – इंदिरा – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●2010 – रावणन – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
■फिल्मफेअर पुरस्कार
●1995 – बरसात – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●1998 – दिल से.. – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
●2000 – हॅलो – सर्वोत्कृष्ट चित्रपट [क्रिटिक्स]
●2001 – अशोका – सर्वोत्कृष्ट छायांकन
■फिल्मफेअर पुरस्कार साऊथ
●1997 – इरुवर – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर
●1999 – वानप्रस्थम – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर
■आयफा पुरस्कार
●2002 – अशोका – IFFA सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार
■स्टार स्क्रीन अवॉर्ड्स
●2005 – मीनाक्सी: अ टेल ऑफ थ्री सिटीज – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
■झी सिने अवॉर्ड्स
●2005 – मीनाक्सी: अ टेल ऑफ थ्री सिटीज – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
■आंतरराष्ट्रीय पुरस्कार
●1998 – द टेररिस्ट – कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
●1998 – द टेररिस्ट – कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन पिरॅमिड
●1999 – मल्ली – शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फीचर फिल्म आणि व्हिडीओसाठी ॲडल्ट्स ज्युरी पुरस्कार
●1999 – द टेररिस्ट – सिनेमनिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्रँड ज्युरी पुरस्कार
●1999 – द टेररिस्ट – सिनेमनिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी लिनो ब्रोका पुरस्कार
●2000 – मल्ली पोझनन बकरी – 18व्या अल किनो येथे आंतरराष्ट्रीय युथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये
●2000 – द टेररिस्ट – साराजेवो चित्रपट महोत्सवात सन्माननीय पॅनोरमा ज्युरी पुरस्कार
●2000 – मल्ली – सिएटल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये उदयोन्मुख मास्टर्स शोकेस पुरस्कार
●2004 – मल्ली – लॉस एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी ऑडियन्स पुरस्कार
●2005 – नवरसा – मोनॅको आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
★सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – बॉबी डार्लिंग
★एंजेल इंडिपेंडंट स्पिरिट अवॉर्ड – नवरसा – संतोष सिवन
●2008 – बिफोर द रेन्स – वर्ल्डफेस्ट ह्यूस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट थिएटरिकल फीचरसाठी भव्य पुरस्कार
●2008 – बिफोर द रेन्स – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी क्रिस्टल कोडॅक पुरस्कार.
●2009 – तहान या चित्रपटाने एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये चिल्ड्रन फीचर फिल्म विभागात उच्च प्रशंसा मिळवली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.