भारतात राहून, इथलंच मीठ खाऊन, आपल्याच देशाच्या शत्रूसाठी, पाकड्यांशी हातमिळवणी करत त्यांच्यासाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली हरियाणातील रहिवासी, यूट्यूब व्लॉगर ज्योती मल्होत्राच्या (YouTuber Jyoti Malhotra) अटकेनंतर देशात चांगलीच खळबळ माजली आहे. हेरगिरी करत पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना भारताबद्दल गुप्त माहिती पोहोचवल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिचे एकेक कारनामे ऐकून सामान्य नागिरकच नव्हे तर पोलीसही हैराण झालेत. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (YouTuber Jyoti Malhotra)
ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या काळात ती काय करत होती, याबद्दल पोलिसांनी माहिती दिली. पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी एक ‘अॅसेट’ म्हणजे खास व्यक्ती बनलेली होती. ही थेट पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिने पाकिस्तानसोबतच चीनचेही दौरे केले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर ७ मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत होते. त्या काळातही ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिने पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्यालाही संपर्क केला होता, असे पोलिसांनी सांगितले. (YouTuber Jyoti Malhotra)
ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल
हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन म्हणाले, ‘ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल विथ जो नावाने एक यु ट्यूब चॅनेल चालवते. तिच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती मल्होत्राकडील मोबाईलसह इतर सर्व संपर्काच्या वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यातून हे समोर येईल की, ज्योती मल्होत्राने पाकिस्तानला भारताबद्दल कोणती-कोणती माहिती दिली होती. ती सातत्याने पाकिस्तानी एजंट्स संपर्कात होती, हे मात्र समोर आले आहे. (YouTuber Jyoti Malhotra)
वर्षभरापूर्वीच वॉर्निंग
ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली असली तरीही, तिच्याबद्दल वॉर्न करणारा, तिच्या पाकिस्तानच्या वाढत्या भेटींबद्दल, पाकिस्तानशी असलेल्या लिंकबद्दल इशारा देणारी एक पोस्ट, साधारण वर्षभरापूर्वीच करण्यात आली होती. मे 2024 मध्ये करण्यात आलेली पोस्ट आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. 33 वर्षांच्या ज्योती मल्होत्राबद्दल कपिल जैन नावाच्या व्यक्तीने सुमारे वर्षभरापूर्वीच धक्कादायक दावा करत तिच्यापासून सावध राहण्याचा तसेच तिच्यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला होता. ज्योती मल्होत्रा हिच्या संशयास्पद हालचालींबाबत चिंता व्यक्त करत एनआयएने तिची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली जैन यांनी केली होती. (YouTuber Jyoti Malhotra)
@NIA_India please keep close watch on this lady..she first visited and attained pakistani embassy function then visited pakistan for 10 days now she is heading for kashmir… may be some link behind all these pic.twitter.com/kfrXZNhMuE
— kapil Jain (@chupchaplo) May 10, 2024
कपिल जैन यांच ट्विट
1 मे 2024 रोजी कपिल जैन नावाच्या व्यक्तीने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर एक ट्विट केलं होतं. त्यात त्याने ज्योती मल्होत्रा हिच्या यूट्यूब चॅनेलचे काही स्क्रीनशॉट्सही जोडले होते. ‘ NIA, कृपया या महिलेवर बारकाईने लक्ष ठेवा. ती आधी पाकिस्तानच्या दूतावासात फंक्शनसाठी गेली. त्यानंतर दहा दिवसांसाठी ती पाकिस्तानमध्ये होती. आता ती काश्मीरमध्ये जात आहे. या सर्वांमागे काही कनेक्शन असू शकतं..’असा दावा करत जैन यांनी ट्विट केलं होतं. त्यामध्ये ज्योतीच्या पेजचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते. (YouTuber Jyoti Malhotra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community