‘Operation Sindoor’मध्ये महिला जवानांनी दिली धाडसी लढत; कोण आहेत नेहा भंडारी ?

143

जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) तैनात असलेल्या तरुण महिला BSF जवानांनी ‘अग्निदिव्य’ पार पाडले आहे. अखनूरमधील (Akhnoor) दोन फॉरवर्ड चौक्यांचे तीन दिवस आणि तीन रात्रीपर्यंत सलग आणि जोरदार प्रतिहल्ला करून शेजारच्या सियालकोटमधील पाकिस्तानी चौक्यांवर गोळीबार करत या महिला तुकडीने धाडसाने संरक्षण केले.

(हेही वाचा – Punjab Blast : पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

तीन वर्षांपूर्वीच दलात दाखल झालेल्या असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी (Neha Bhandari) यांच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) सहा महिला जवानांनी ही कामगिरी पार पाडली. अशा प्रकारे महिला तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या नेहा भंडारी या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. लष्कराने अजूनही आपल्या महिला कर्मचाऱ्यांना अशा भूमिकांसाठी वापरलेले नाही.

जेव्हा त्यांच्या शस्त्रांमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शत्रूला मागे हटावे लागले आणि त्यांच्या पुढील चौक्या सोडाव्या लागल्या, तेव्हाच महिला ‘सीमा प्रहारीं’नी आक्रमण थांबवले. (Pahalgam Terror Attack)

एसी भंडारी यांच्या कमांडखालील सहा BSF महिलांपैकी, चार नुकतेच २०२३ मध्ये रुजू झाल्या होत्या, तर इतर दोघींनी जवळपास १७ वर्षे सेवा केलेली आहे. पंजाबमधील मनजीत कौर आणि मलकीत कौर या दोन अनुभवी महिलांनी एक निरीक्षण चौकी आणि बंकर अशा दोन फॉरवर्ड चौक्यांवर मोर्चा सांभाळला. या वेळी पश्चिम बंगालमधील स्वप्ना रथ आणि शांपा बासक, झारखंडमधील सुमी झेस आणि ओडिशामधील ज्योती बानियान यांच्यासाठी युद्धसदृश परिस्थितीत त्यांच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची आणि मानसिक लवचिकतेची चाचणी घेण्याची संधी उपलब्ध झाली.

इतर अधिकाऱ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यावर येणाऱ्या आव्हानाची जाणीव ठेवून महिलांना आणि सीमेवरील गोळीबार सुरू असलेल्या चौक्यांतून सक्रिय युद्ध कर्तव्यातून माघार घेण्याचा पर्याय दिला. तेव्हा या महिला तुकडीने नकार दिला. ‘जेव्हा आम्ही सैनिक म्हणून प्रशिक्षण घेतले, तेव्हा आमचे प्रशिक्षण आणि संसाधने आमच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच होती’, असे या महिला अधिकाऱ्यांनी सांगितले आणि विजय मिळेपर्यंत कर्तव्य सुरुच ठेवले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.