दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा देऊ; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM Modi यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी (PM Modi) आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे.

477
PM Narendra Modi यांनी देशाच्या प्रगती आणि विकासाचे श्रेय 'या' घटकाला दिले
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अंदाजे 25 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लष्कराने परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. दहशतवाद्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले.
पंतप्रधान मोदी (PM Modi) आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही,’ अशी प्रतिक्रियी PM Modi यांनी व्यक्त केली. पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली ज्यामध्ये आयबी प्रमुख आणि गृहसचिव उपस्थित होते. बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) घटनेची सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री शाह म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती दिली आहे. शिवाय, हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असा निर्धार गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.