Pakistan जिथे उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरु होते; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांची जोरदार टीका

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या लष्करी कारवाईच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी श्रीनगरला पोहोचले.

93

पाकिस्तान हा देश भिकारी बनला आहे, ते त्याचे स्व कर्तृत्व आहे. पाकिस्तान जिथे उभा राहतो तिथेच भिकाऱ्यांची रांग सुरू होते. तुम्ही नुकतेच ऐकले असेल की ते पुन्हा एकदा आयएमएफकडे कर्ज मागण्यासाठी गेले. दुसरीकडे, आपला देश, आज आपण त्या देशांच्या श्रेणीत येतो, जे आयएमएफला निधी देतात जेणेकरून आयएमएफ गरीब देशांना कर्ज देऊ शकेल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत बिघडले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या लष्करी कारवाईच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी श्रीनगरला पोहोचले. येथील सुरक्षेचा आढावा घेताना त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान हुतात्मा झालेल्या आपल्या सैनिकांना मी सलाम करतो. जखमी सैनिकांच्या धाडसालाही मी सलाम करतो आणि देवाला प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे होतील. मी येथे तुमच्या उर्जेचा अनुभव घेण्यासाठी आलो आहे, ज्याने शत्रूंचा नाश केला. ज्या प्रकारे तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर नष्ट केले, ते शत्रू कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही पाहिले असेल की सहसा लोक उत्साहात आपले होश गमावतात, परंतु तुम्ही तुमचा उत्साह कायम ठेवला, आपले होश ठेवले आणि विवेकाने शत्रूचे अड्डे नष्ट केले, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

(हेही वाचा India ने पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र साठ्यावर हल्ला केला; न्यू यॉर्क टाईम्सचा खुलासा )

संपूर्ण जगाने पाहिले आहे की पाकिस्तानने किती बेजबाबदारपणे भारताला अनेक वेळा अण्वस्त्र धमक्या दिल्या आहेत. आज, श्रीनगरच्या भूमीवरून, मी संपूर्ण जगासमोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितो की, अशा बेजबाबदार आणि दुष्ट देशांच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अण्वस्त्रे आयएईएच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत. भारताच्या भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्ध समजला जाईल, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

आपल्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होवू शकत नाहीत आणि जर चर्चा झाली तर ती दहशतवादावर, पीओकेवर असेल. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक ऑपरेशन नाही. २१ वर्षांपूर्वी याच पाकिस्तानने अटलजींसमोर इस्लामाबादमध्ये घोषणा केली होती की, त्यांच्या भूमीवरून आता दहशतवाद निर्यात केला जाणार नाही. परंतु पाकिस्तानने भारताला फसवले आणि अजूनही ते फसवत आहे. आता त्याला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे आणि ही किंमत सतत वाढत जाणार आहे. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर ही भारताने दहशतवादाविरुद्ध केलेली आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. ३५ ते ४० वर्षांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. आज भारताने संपूर्ण जगाला हे स्पष्ट केले आहे की, दहशतवादाच्या विरोधात आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

(हेही वाचा सैनिकी शाळांचा कायापालट! CM Devendra Fadnavis यांचे शैक्षणिक सुधारणांचे मोठे पाऊल)

ऑपरेशन सिंदूर हे केवळ ऑपरेशनचे नाव नाही तर ती एक वचनबद्धता आहे. एक वचनबद्धता ज्यामध्ये भारताने दाखवून दिले आहे की आपण फक्त संरक्षण करत नाही तर  वेळ आल्यावर आपण कठोर निर्णय देखील घेतो. हे ऑपरेशन प्रत्येक सैनिकाच्या डोळ्यात एक स्वप्न होते की आपण प्रत्येक दहशतवादी अड्ड्यापर्यंत पोहोचू, मग ते दऱ्याखोऱ्यांमध्ये लपलेले असोत किंवा बंकरमध्ये. शत्रूची छाती फाडून दहशतवादी अड्डे नष्ट करूनच आपण परत येऊ, असा सैन्यामध्ये विश्वास  निर्माण झाला आहे, असेही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.