अमेरिकेचे राष्ट्रपती Donald Trump यांचा दावा, भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार; भारताच्या घोषणेकडे लक्ष

129

मागील तीन दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे. भारताने पाकिस्तानकड्न होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कायमचा तोडगा काढण्याच्या उद्देशाने भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. युद्धजन्य स्थित सुरु असतानाच शनिवार, १० मे रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटने ट्विस्ट आणला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोघे शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, असे म्हटले आहे. मात्र भारताने अधिकृत घोषणा केली नाही शुक्रवारपासून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय भारत आणि पाकिस्तान यांच्याशी चर्चा करत होते.

(हेही वाचा Terrorism : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता दहशतवादी कृत्य ‘ऍक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार)

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काय म्हटले? 

अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.