America : “आता परिणाम भोगायला तयार रहा…” अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

America : "आता परिणाम भोगायला तयार रहा..." अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

64
America :
America : "आता परिणाम भोगायला तयार रहा..." अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

अमेरिकेचे (America) संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला इशारा दिला आहे.हेगसेथ यांनी एका ठिकाणी बोलताना म्हटलं आहे की, इराणकडून हुती बंडखोरांना जे विघातक समर्थन आणि मदत दिली जात आहे, त्याची सगळी माहिती अमेरिकेला आहे. त्यामुळे आता याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. (America)

हेही वाचा-Pahalgam Attack नंतर भारतात ‘या’ पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड !

अमेरिकेचे संरक्षण मंत्री हेगसेथ म्हणाले की, “अमेरिका आपल्या पद्धतीने ठरवेल की, केव्हा आणि कशी कारवाई करायची आहे. तुमच्याकडून (इराण) हूती बंडखोरांना जे विध्वंसक पाठबळ दिलं जात आहे. त्याची सगळी माहिती आम्हाला आहे.” पुढे ते म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, तुम्ही काय करत आहात. तुम्हाला हेही माहिती आहे की, अमेरिकेचे सैन्य काय करू शकते. तुम्हाला इशारा दिला गेला आहे. आता परिणाम भोगण्यासाठी तयार रहा”, असा धमकी वजा इशारा हेगसेथ यांनी इराणला दिला आहे. (America)

हेही वाचा- Pahalgam Terror Attack : लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी ! दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावला आणि …

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा लाल समुद्राच्या हद्दीत हूती बंडखोरांकडून व्यावसायिक जहाजांवर हल्ले केले जात आहे. अमेरिकेचा असा दावा आहे की, या हल्ल्यांमागे इराण आहे. त्यांची काहीतरी रणनीती आहे आणि त्यांचेच सैन्य हूती बंडखोरांना मदत करत आहे. (America)

हेही वाचा- Maharashtra Day : महाराष्ट्र पुरोगाम्यांची नव्हे, संतांची पावन भूमी!

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या विधानाचे आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. कारण यापूर्वीही अमेरिकेने अनेकदा इराणला इशारा दिला आहे. इराणने या क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देणे बंद करावे, असे अमेरिकेने म्हटले होते. दुसरीकडे हूती बंडखोरांचा असा दावा आहे की, हा हल्ला अमेरिकेनेच केला आहे. (America)

हेही वाचा- Maharashtra Day : शौर्याची परंपरा; शिवकालीन मर्दानी खेळ

हुती बंडखोरांच्या गटाला इराणचे समर्थन आहे. त्यांनी उत्तर येमेनवर कब्जा केलेला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लाल समुद्रात हूती बंडखोर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच आता अमेरिका इराणविरोधात आक्रमक झाली आहे. (America)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.