US Army Day : पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांना अमेरिकेचं निमंत्रण?; व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

US Army Day : अमेरिकेच्या लष्कराच्या परेड(US Army Day)ची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. कारण, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेच्या लष्करी परेड(US Army Day)साठी निमंत्रण आल्याची चर्चा सुरु आहे.

167

US Army Day : अमेरिकेच्या लष्कराच्या परेड(US Army Day)ची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. कारण, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेच्या लष्करी परेड(US Army Day)साठी निमंत्रण आल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांना आता पूर्णविराम दिला असून व्हाईट हाऊसने या वृत्ताचे खंडन केले आहे. लष्करप्रमुख मुनीर यांना अमेरिकन लष्करी परेडकरिता निमंत्रण दिले नसल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.(US Army Day)

(हेही वाचा PM Narendra Modi : १५ ते १९ जून दरम्यान विदेश दौऱ्यावर; पंतप्रधान ‘या’ देशांना पहिल्यांदाच देणार भेटी )

अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेत होणाऱ्या लष्करी परेड(US Army Day)मध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना आमंत्रित करण्यात आल्याच्या वृत्ताचे व्हाईट हाऊसने खंडन केले आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले की, हे खोटे असून कुठल्याही विदेशी लष्कर प्रमुखाला आमंत्रित करण्यात आले नव्हते.

खोटं वृत्त नेमकं काय होतं?

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तात म्हटले आहे की, “हे खोटे आहे. कोणत्याही परदेशी लष्करी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना १४ जून रोजी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ७९ व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन सैन्या(US Army Day)च्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेने आमंत्रित केल्याची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख गुरुवार, १३ जूनलाच अमेरिकेत दाखल होतील असेही सांगण्यात आलं होतं. मात्र, या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आर्मी परेड(US Army Day)ला लष्करप्रमुख मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता.(US Army Day)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.