UNSC : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे(UNSC)त मोठा धक्का बसला आहे. दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मिळविण्यास UNSC मधील इतर देशांनी नकार दिला आहे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यांवरून सतत जागतिक स्तरावर तोंडघशी पडत आहे. पाकिस्तान युएनएससीमध्ये दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मिळावे, ही मागणी सातत्याने लावून धरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला धक्का बसला आहे.(UNSC)
(हेही वाचा ‘…जेव्हा जर्मन चान्सलर Donald Trump यांना त्यांच्या आजोबांचे जन्म प्रमाणपत्र भेट देतात’; वाचा नेमकं काय झालं? )
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला तालिबान निर्बंध समितीचे अध्यक्षपद व दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या मागण्यांवर युएनएससी(UNSC)मध्ये सर्व राष्ट्रांचे एकमत होऊ शकले नाही. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या समित्यांबाबत सुमारे पाच महिने विलंब झाला. या संदर्भातला निर्णय जानेवारी २०२५ पर्यंत घ्यायला हवा होता. याचे महत्त्वाचे कारण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील प्रमुख राष्ट्रांचे पाकिस्तानच्या मागण्यांवर एकमत नसल्याने निर्णयास विलंब झाल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा ICT : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिली १५१ कोटींची देणगी; म्हणाले, ‘गुरदक्षिणा म्हणून…’ )
संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य पाकिस्तानच्या मागण्यांबद्दल सकारात्मक नसल्याचे समोर आले आहे. दहशतवादाशी संबंधित समित्यांबाबत युएनएससी(UNSC)मधील राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका यांसारखे प्रमुख राष्ट्र पाकिस्तानला कुठल्याही समितीचे अध्यक्षपद देऊ इच्छित नाही. त्यामुळे आता जागतिक स्तरावरही पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागल्याचे दिसत आहे.(UNSC)
Join Our WhatsApp Community