बिहारच्या मधुबनी जिल्ह्याच्या नेपाळ सीमेवर (Bihar-Nepal Border) एसएसबीने दोन चिनी तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा सापडलेला नाही. हे दोन्ही तरुण भारत-नेपाळ सीमेवरील (Bihar-Nepal Border) नो मॅन्स लँडची व्हिडीओग्राफी करताना पकडले गेले आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. (Bihar-Nepal Border)
हेही वाचा-Mock drill : २९ मे रोजी सीमावर्ती राज्यांमध्ये होणारे मॉक ड्रिल पुढे ढकलले !
जटही-पिपरौन बॉर्डरवरून (Bihar-Nepal Border) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे सीमेवर व्हिडीओग्राफी का करत होते, यामागचे कारण तपासले जात आहे. यापैकी एकाला फक्त चिनी भाषा येते, तर दुसरा तुटक तुटक इंग्रजी बोलत आहे. या दोघांनी कागदपत्र हॉटेलमध्ये ठेवल्याचे म्हटले आहे. यामुळे अद्याप त्यांची नावे आणि पत्ता सापडलेला नाही. चिनी नागरिकांना भारतीय सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्याने चीन पुन्हा सीमेवर काहीतरी आगळीक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Bihar-Nepal Border)
हेही वाचा- मंत्री Akash Fundkar यांच्या पुढाकाराने कलाकारांच्या हक्कांसाठी समितीची घोषणा
४८ व्या बटालियन जयनगरचे पिप्राव एसएसबीचे प्रभारी निरीक्षक सुनील दत्त आणि हरलाखीचे एसएचओ निरीक्षक अनुप कुमार आणि अतिरिक्त पोलिस स्टेशन प्रमुख आदित्य कुमार या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आयबीचे अधिकारी देखील सक्रीय झाले आहेत. (Bihar-Nepal Border)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community