युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी काल (शुक्रवारी 28 फेब्रु.) व्हाईट हाऊसला (White House) भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी झेलेन्स्की यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
अवघ्या 10 मिनिटांच्या वादात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या खडाजंगीने अवघ्या जगात चर्चा रंगली असून व्हाईट हाऊसच्या इतिहासात अशी चर्चा कधीच झाली नव्हती. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना उद्धटपणे सांगितले की ते अमेरिकन मदतीबद्दल कृतज्ञ नाहीत. तुम्ही कोणताही करार करण्याच्या स्थितीत नाही. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेने जुगार खेळत आहात. एकतर तुम्ही करार करा किंवा आम्ही या करारातून बाहेर पडू.
After Vance accused Zelensky of not saying thank you, Zelensky is now tweeting individual thanks to every single world leader expressing solidarity with Ukraine. pic.twitter.com/ClTCENxJyz
— Kareem Rifai 🌐 (@KareemRifai) February 28, 2025
ओव्हल ऑफिसमध्ये येऊन मीडियासमोर आपले म्हणणे मांडणे आणि आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हा अपमान असल्याचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितले. यावर झेलेन्स्की यांनी वान्स यांना विचारले की, तुम्ही युक्रेनला तेथील समस्या पाहण्यासाठी गेला आहात का? या युद्धाचा परिणाम अमेरिकेवरही होणार आहे.
“आम्हाला काय वाटले पाहिजे ते आम्हाला सांगू नका,” असे म्हणत ट्रम्प चिडले. आम्हाला काय वाटेल ते सांगण्याच्या स्थितीत तुम्ही नाही आहात. आम्ही खूप मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेले असू. या वादानंतर झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊस सोडले. ट्रम्प आणि त्यांच्यामध्ये युक्रेनमधील दुर्मिळ खनिजांबाबत कोणताही करार झालेला नाही. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या जाहीर वादानंतर झेलेन्स्की यांच्याबद्दल जगभरातील अनेक नेत्यांनी समर्थन व्यक्त केले, ज्यात पंतप्रधान ट्रुडो यांचाही समावेश आहे.
दरम्यान, मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादाबद्दल झेलेन्स्की यांना माफी मागण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी अध्यक्ष झेलेन्स्की आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील भेटीचे वर्णन “फियास्की” असे केले आहे आणि युक्रेनियन नेत्याला खरोखर रशियासोबत शांतता हवी आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. “त्यांना तिथे जाऊन विरोधक बनण्याची गरज नव्हती,” असे रुबियो यांनी सीएनएनवर सांगितले.
मेलोनी यांनी शिखर परिषद बोलावली
इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी आजच्या प्रमुख आव्हानांना सामोरे जाण्याचा आमचा हेतू कसा आहे याबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी युनायटेड स्टेट्स, युरोपियन राज्ये आणि मित्र राष्ट्रांमध्ये तातडीची शिखर परिषद बोलावली. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमधील घटनेचे वर्णन एक गंभीर आणि निराशाजनक घटना असल्याचे सांगितले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community